शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: काम नसल्यामुळे गावाकडे निघाला, बिसूरजवळ रेल्वेतून पडून परप्रांतीय मजूर ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 18:06 IST

दरवाजामध्ये बसल्यानंतर त्याचा तोल जाऊन पडल्यामुळे मृत्यू झाला

सांगली : सांगली ते नांद्रे या रेल्वे मार्गावर बिसूर (ता. मिरज) येथील रेल्वे गेट नंबर २४ येथे रेल्वेतून पडून खेरवईदिन मुखिया प्रजापती (वय २५) हा उत्तर प्रदेशातील मजूर ठार झाला. मंगळवारी सायंकाळी हा अपघात झाला. प्रजापती हा कोल्हापूर येथे राहत होता. काम नसल्यामुळे गावाकडे जात असताना तो नशेत रेल्वेतून पडून ठार झाल्याची माहिती प्राथमिक तपासात पुढे आली.मंगळवारी सायंकाळी रेल्वेतून तरुण खाली पडून अपघात झाल्याची माहिती सांगली ग्रामीण पोलिसांना मिळताच त्यांनी स्पेशल रेस्क्यू फोर्सला पाचारण केले. घटनास्थळी रुग्णवाहिका जात नव्हती. स्पेशल रेस्क्यू फोर्सचे कैलास वडार, महेश गव्हाणे, सागर जाधव, अनिल बसरगट्टी, सदाशिव बेडेकर आदींनी दूरवर रुग्णवाहिका थांबविली. घटनास्थळी जाऊन दुचाकीवरून मृतदेह प्लास्टिक कागदातून गुंडाळून रुग्णवाहिकेपर्यंत आणला. मृताचे नाव खेरवईदिन प्रजापती असल्याचे तपासात स्पष्ट झाले. तो कामासाठी कोल्हापूर येथे राहत होता. कोल्हापूरमध्ये काम मिळत नसल्यामुळे त्याने गावाकडे जाण्याचा निर्णय घेतला होता. मंगळवारी दुपारी तो रेल्वेतून निघाला. प्रवास करताना त्याने दारू प्यायली होती. दरवाजामध्ये बसल्यानंतर त्याचा तोल जाऊन पडल्यामुळे मृत्यू झाला असल्याची माहिती चौकशीत पुढे आली. घटनास्थळी त्याच्या कपड्यामधून दारूची बाटली व खिशातून नंबरची डायरी मिळाली. त्याच्या डायरीतून संपर्क साधून नातेवाइकांना कळविण्यात आले. त्यांनी सांगलीत सिव्हिल हॉस्पिटलमध्ये येऊन पाहणी केल्यानंतर ओळख पटली. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. सांगली ग्रामीण पोलिस तपास करीत आहेत.