शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
4
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
5
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
6
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
7
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
8
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
9
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
10
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
11
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
12
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
13
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
14
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
15
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
16
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
17
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
18
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
19
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
20
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!

म्हैसाळ महाविद्यालय गावातच राहावे, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे ग्रामपंचायतीच्या दारात आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2022 16:27 IST

म्हैसाळ : म्हैसाळ महाविद्यालय, म्हैसाळ हे गावातच राहावे यामागणीसाठी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ग्रामपंचायती समोर आंदोलन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी महाविद्यालय आपल्या ...

म्हैसाळ : म्हैसाळ महाविद्यालय, म्हैसाळ हे गावातच राहावे यामागणीसाठी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ग्रामपंचायती समोर आंदोलन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी महाविद्यालय आपल्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे, आमच्या शिक्षणाच्या आडवे येऊ नका अशा घोषणा देत परीसर दणाणून सोडला. या आंदोलनाचे नेतृत्व ग्रामपंचायतीचे सदस्य पुष्पराज केदाररावजी शिंदे-म्हैसाळकर यांनी केले. यावेळी निवेदन घेण्यास विरोध करणाऱ्या ग्रामपंचायतीने पोलिसांच्या मध्यस्थीनंतर हे निवेदन स्विकारले.या निवेदनात म्हटले आहे की, सन २००९-१० पासून म्हैसाळ येथे सेनापती प्रतापराव गूजर शिक्षण संस्था कानडेवाडी संचलित शिवाजी विद्यापीठ संलग्नित म्हैसाळ महाविद्यालय म्हैसाळ या नावाने वरीष्ठ महाविद्यालय सुरू आहे. हे महाविद्यालयाय कासेगाव एज्युकेशन सोसायटी संस्थेकडे वर्ग करण्याच्या प्रक्रिया शासन स्तरावर सुरू आहेत. हे महाविद्यालय जिल्हा परिषदेच्या मालकीचे आहे. परंतु म्हैसाळ ग्रामपंचायतीकडून कोरोना काळात १४ एप्रिल २०२१ पासून कोव्हिड बांधित रूग्णांसाठी विलगीकरण कक्षा करीता महाविद्यालयाचा ताब्यात घेतला होता.विलगीकरण कक्ष २६ ऑगस्ट २०२१ रोजी बंद झाले असून अद्यापही प्राचार्य कक्ष व कार्यालय वगळता इतर वर्ग खोल्यांना म्हैसाळ ग्रामपंचायतीकडून कुलपे घालण्यात आली आहेत. ग्रामपंचायतीच्या कार्यवाहीमुळे महाविद्यालयाचे सर्व कामकाज ठप्प झाले असून यांचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनावर होत आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी सदर शाळेचे वर्ग सुरू करून देण्याची विनंती महाविद्यलायाच्यावतीने करण्यात आली.

पुष्पराज शिंदे-म्हैसाळकरांनी तोडली कुलपेविद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून पुष्पराज शिंदे-म्हैसाळकरांनी महाविद्यायाचे कुलुप तोडून महाविद्यालय सुरू करून दिले आहे. यामुळे सरपंच व त्यांच्या पती यांच्याकडून पोलीस कारवाईची धमकी देण्यात आली. मात्र, विद्यार्थ्यांसाठी तुरूंगात जायला लागले तरी चालेल पण विद्यार्थ्यांना न्याय मिळाल्याशिवाय मागे हटणार नसल्याचे ग्रामपंचायत सदस्य शिंदे-म्हैसाळकरांनी सांगितले.

राजकारणामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. गेले अनेक वर्ष महाविद्यालय चांगल्या प्रकारे सुरू आहे. पण ग्रामपंचायत महाविद्यालय सुरू करण्यासाठी जाणीव पूर्वक आडमुठी भूमिका घेत आहे. - डॉ. रिना पाटील,  प्राध्यापिका- म्हैसाळ महाविद्यालय 

म्हैसाळ महाविद्यालय ग्रामपंचायतीच्या ताब्यात असलेल्या जिल्हा परिषदेच्या खोल्या आहेत. त्या ग्रामपंचायतीने सील केले होते. ते सील तोडून महाविद्यालय उघडले आहे. हे बेकायदेशीर आहे. - रश्मी शिंदे -म्हैसाळकर, सरपंच, ग्रामपंचायत म्हैसाळ

प्रत्येक गोष्टीत ग्रामपंचायत अडथळा आणत असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीला विनंती आहे की त्यांनी सहकार्य करावे - ऐश्वर्या पवार, विद्यार्थ्यांनी

टॅग्स :SangliसांगलीStudentविद्यार्थीgram panchayatग्राम पंचायत