रुपाली चाकणकर यांना धमकावणारा मानसिक रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2020 00:45 IST2020-12-27T00:44:53+5:302020-12-27T00:45:24+5:30
जयंत रामचंद्र पाटील याने अर्वाच्य भाषा वापरून चाकणकरांचे कार्यालय पेटवून देण्याची धमकी दिली होती.

रुपाली चाकणकर यांना धमकावणारा मानसिक रुग्ण
इस्लामपूर (जि. सांगली) : राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेश अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना धमकावणारा जयंत रामचंद्र पाटील (वय ३५, रा. तांबवे, ता. वाळवा) हा मानसिक रुग्ण असल्याचे समोर येत आहे.
जयंत रामचंद्र पाटील याने अर्वाच्य भाषा वापरून चाकणकरांचे कार्यालय पेटवून देण्याची धमकी दिली होती. त्याच्याविरोधात पुणे येथील सिंहगड पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. यापूर्वीही त्याने एका महिला आमदाराला थेट फोन करून लग्नाची मागणी घातल्याची चर्चा आहे. हा तरुण मानसिक रुग्ण असल्याचे तेथील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. या तरुणाची घरची परिस्थिती बेताची आहे. वडील शेतकरी आहेत. त्याने बी.एस्सी.पर्यंत शिक्षण घेतले आहे. तांबवे हे गाव वाळवा तालुक्यात असले तरी, ते शिराळा विधानसभा मतदारसंघात येते.