शहरं
Join us  
Trending Stories
1
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
2
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
4
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
5
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
7
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
8
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
9
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
10
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
11
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
12
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
13
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
14
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
15
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
16
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
17
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
18
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
19
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
20
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज

झाडांमुळे लांबला सांगलीतील मेगाब्लॉक, पुढील सोमवारी शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 11:25 AM

उड्डाणपुलाच्या कामासाठी सोमवारी १७ डिसेंबर रोजी होणारा मेगाब्लॉक काही झाडांच्या अडथळ््यांमुळे लांबला आहे. वनविभागाने ही झाडे हटविण्यास परवानगी दिल्यानंतर आता मेगाब्लॉकसाठीचा मार्ग मोकळा झाला असून पुढील सोमवारी तो करण्यात येण्याची चिन्हे आहेत.

ठळक मुद्देझाडांमुळे लांबला सांगलीतील मेगाब्लॉक, पुढील सोमवारी शक्यवनविभागाकडून परवानगी मिळाल्याने कामास गती

सांगली : उड्डाणपुलाच्या कामासाठी सोमवारी १७ डिसेंबर रोजी होणारा मेगाब्लॉक काही झाडांच्या अडथळ््यांमुळे लांबला आहे. वनविभागाने ही झाडे हटविण्यास परवानगी दिल्यानंतर आता मेगाब्लॉकसाठीचा मार्ग मोकळा झाला असून पुढील सोमवारी तो करण्यात येण्याची चिन्हे आहेत.रेल्वेच्या नियमानुसार उड्डाणपूल उभारताना संबंधित पुलास कोणत्याही प्रकारचा धोका नसायला हवा. सांगलीतील वारणाली येथील रेल्वे उड्डाणपुलाचे काम सुरू असताना पुलाजवळच काही झाडे होती.

भविष्यात ही झाडे पडल्यास किंवा त्यांच्या फांद्या पडून अपघाताचीही चिन्हे होती. त्यामुळे कामाच्या परिक्षणावेळी रेल्वे अधिकाऱ्यांना ही बाब जाणवली. त्यांनी तातडीने मेगाब्लॉक रद्द केला. सार्वजनिक बांधकाम विभागास झाडांबाबतचा निर्णय घेतल्यानंतरच मेगाब्लॉकला किंवा पुढील कामास परवानगी मिळेल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले होते.

त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने वनविभागाची परवानगी तातडीने घेऊन हे काम मार्गी लावले आहे. त्यामुळे मेगाब्लॉकचा अडथळा आता दूर झाला आहे. येत्या दोन दिवसात बांधकाम विभागामार्फत रेल्वेला याबाबतचे पत्र पाठविण्यात येणार आहे. त्यामध्ये पुढील सोमवारी मेगाब्लॉकसाठी परवानगी मागण्यात येणार आहे. त्यास परवानगी मिळण्याची चिन्हे आहेत.

पुलाच्या कामासाठी सहा तासांचा मेगा ब्लॉक करण्यासाठी परवानगी मिळाल्यानंतर उर्वरित तीस टक्के काम जानेवारीपर्यंत पूर्ण होऊन नव्या वर्षात हा पूल सेवेत दाखल होणार आहे.सांगलीच्या वारणाली रेल्वे गेटमुळे या परिसरातील वाहतुकीच्या अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या. नागरिकांचे या गेटमुळे हाल होत होते. वाहतूक कोंडीचा प्रश्नही गंभीर बनला होता. त्यामुळे याठिकाणी उड्डाण पुलाची मागणी वारंवार होत होती. हे काम साडेचार कोटी रुपयांचे आहे. यातील सत्तर टक्के काम पूर्ण झाले आहे.

या उड्डाण पुलाच्या कामात अनेक अडथळे आले होते. सुरुवातीला येथील खोकीधारकांच्या पुनर्वसनासाठी कामात अडथळे आले. पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागल्यानंतर पुन्हा रेल्वे ब्लॉक करण्यासाठी आवश्यक परवानगीसाठी अडथळे निर्माण झाले. त्यामुळे मध्यंतरी काही काळ हे काम रेंगाळले होते.

अखेर आता हे काम मार्गी लागले आहे. त्यामुळे रेल्वे मार्गावरील फॅब्रिकेशन, स्लॅबचे काम आता गतीने होणार आहे. वारणाली रेल्वे गेटजवळ सहा तासांचे हे काम असल्याने हा मेगा ब्लॉक करण्यात येणार आहे. या काळात रेल्वेचे येथील वेळापत्रक बदलण्याची चिन्हे आहेत.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाSangliसांगली