शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: टी.टी.चे इंजेक्शन का देत नाहीस म्हणत वैद्यकीय अधिकाऱ्यास मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 19:08 IST

तासगाव : सावर्डे (ता. तासगाव) येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य पथकाकडील औषध निर्माण अधिकारी जालिंदर महादेव कांबळे यांना टी.टी.चे ...

तासगाव : सावर्डे (ता. तासगाव) येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य पथकाकडील औषध निर्माण अधिकारी जालिंदर महादेव कांबळे यांना टी.टी.चे इंजेक्शन का देत नाहीस, असा जाब विचारत सावर्डे येथील गजेंद्र शिवाजी पाटील याने शिवीगाळ करत मारहाण केली. तर वैद्यकीय अधिकारी डॉ. मनीषा पाटील यांना शिवीगाळ केली. याप्रकरणी कांबळे यांनी गजेंद्र पाटील यांच्या विरोधात तासगाव पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.सावर्डे येथे जिल्हा परिषदेचे प्राथमिक आरोग्य पथक आहे. याठिकाणी वैद्यकीय अधिकारी आणि औषध निर्माण अधिकारी कार्यरत आहेत. सोमवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास वैद्यकीय अधिकारी डॉ. पाटील या मासिक अहवाल देण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाकडे गेल्या होत्या. याचवेळी तात्यासाहेब जगन्नाथ सदाकळे यांना जखम झाल्यामुळे त्यांच्यावर उपचार करण्यासाठी, गजेंद्र शिवाजी पाटील हा आरोग्य पथकात घेऊन आला होता. यावेळी औषध निर्माण अधिकारी कांबळे यांनी सदाकळे यांचा केस पेपर नोंद करून त्यांच्यावर औषधोपचार केला. मात्र, यावेळी गजेंद्र पाटील याने कांबळे यांच्यासोबत वाद घालून शिवीगाळ केली. ‘टीटीचे इंजेक्शन का देत नाहीस?’ असा जाब विचारत शिवीगाळ करू लागला.यावेळी त्यांनी ‘याठिकाणी इंजेक्शन देण्याची सोय नाही. तुम्ही चिंचणी प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन जा,’ असे समजावून सांगितले. मात्र, पाटील याने शिवीगाळ करत, दमदाटी करून दवाखान्यातील साहित्य विस्कटून लावले. दवाखान्याबाहेर ओढत नेत चप्पलने मारहाण केली. शासकीय कामात अडथळा आणून पाठीत, हातावर, पायावर, डोक्यात मारहाण करून जखमी केले. त्याचवेळी डॉक्टर पाटील त्याठिकाणी आल्या. त्यांनी पाटील याला ‘मारहाण कशासाठी करत आहेस? असे विचारले असता, पाटीलने डॉ. पाटील यांनाही शिवीगाळ केली. अधिक तपास तासगाव पोलिस करत आहेत.

टॅग्स :Sangliसांगलीdoctorडॉक्टरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस