मसुचीवाडीचा तरुण अपघातात जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:29 AM2021-04-09T04:29:39+5:302021-04-09T04:29:39+5:30

सांगली : मसुचीवाडी (ता. वाळवा) येथील तरुण दुचाकीवरून जखमी झाला. विशाला शिवाजी पवार (२८) असे जखमीचे नाव असून गुरुवारी ...

Masuchiwadi youth injured in accident | मसुचीवाडीचा तरुण अपघातात जखमी

मसुचीवाडीचा तरुण अपघातात जखमी

googlenewsNext

सांगली : मसुचीवाडी (ता. वाळवा) येथील तरुण दुचाकीवरून जखमी झाला. विशाला शिवाजी पवार (२८) असे जखमीचे नाव असून गुरुवारी सायंकाळी हा प्रकार घडला. त्यास उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

---

मिरजेत एकास मारहाण

सांगली : मिरज शहरातील नदीवेस परिसरातील एकास मारहाण झाली. सिकंदर शब्बीर शेख (३७) असे जखमीचे नाव असून गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास ही घटना घडली. त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

---

कुपवाडचा तरुण अपघातात जखमी

सांगली : कुपवाड येथील तरुण दुचाकीवरून पडून जखमी झाला. कुमार हरिश्चंद्र व्हनकडे (३०) असे जखमीचे नाव आहे. गुरुवारी दुपारी अडीचच्या सुमारास ही घटना घडली. त्यास उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

---

थबडेवाडी येथे एकास सर्पदंश

सांगली : थबडेवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथे एकास सर्पदंश झाला. नारायण धोंडीराम खोत असे जखमीचे नाव आहे. गुरुवारी सकाळी आठच्या सुमारास ही घटना घडली. त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

---

Web Title: Masuchiwadi youth injured in accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.