शहरं
Join us  
Trending Stories
1
२०६ च्या एकदम ४४...! सीआयए अन् मोसादनं रचला काँग्रेसला हरवण्याचा कट? माजी खासदाराचा मोठा दावा, काय तर्क दिला? जाणून घ्या
2
इम्रान खान कुठे आहेत? पाकिस्तान संसदेत पीटीआयचा गदारोळ; बहिणी तुरुंगाबाहेच बसून...
3
"२ तारखेपर्यंत मला युती टिकवायचीय"; शिवसेनेसोबतच्या वादावर रविंद्र चव्हाणांचे मोठे राजकीय संकेत...
4
WPL 2026 Auction : अनुष्का शर्माचं नाव येताच RCB तिच्या मागून धावला! पण खर्च नाही झेपला अन्...
5
“भाजपा पैसे वाटल्याशिवाय जिंकू शकत नाही, भविष्यात महायुती टिकणार नाही”: विजय वडेट्टीवार
6
ट्रेनमध्ये प्रवास करताना नेटवर्क का जाते? इंटरनेट का होते स्लो? जाणून घ्या 'या' समस्येवरचा उपाय
7
एकपेक्षा जास्त लग्न करणे गुन्हा...'या' राज्यात विधेयक मंजूर; दंडासह कठोर शिक्षेची तरतूद
8
ॲपल अडकली? भारतात ₹३.२० लाख कोटी दंडाची टांगती तलवार; कायदा बदलला अन्...
9
३०० सीट वाढणार, ४ कोच कायमस्वरुपी जोडले जाणार; वंदे भारत ट्रेनला प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद
10
मन हेलावून टाकणारी घटना...! पती, पत्‍नी, प्रियकर अन् एक अजब करार...! सर्वत्र होतेय चर्चा 
11
टाटा सिएरा खरेच ₹११.४९ लाखांना मिळणार? नेक्सॉन, हॅरिअरलाच खाऊन टाकणार..., हो, नाही...
12
अरेच्चा! भारतीयांना 'हे' शब्द नीट उच्चारताच येत नाही; तुम्ही Croissant, Ghibli चा उच्चार चुकवता?
13
Hong Kong Fire : अग्निकल्लोळ! हाँगकाँगमध्ये इमारतीला कशी लागली एवढी मोठी आग? ५५ जणांचा मृत्यू, २७९ जण बेपत्ता
14
अजय देवगणच्या अश्लील डीपफेकवर दिल्ली हायकोर्टाचा मोठा आदेश, अभिनेत्यालाही केले सवाल
15
घुसखोरांना मतदानाचा अधिकार द्यायचा का? SIR प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाची महत्वपूर्ण टिप्पणी
16
WPL 2026 Auction : होऊ द्या खर्च! मुंबई इंडियन्सनं Amelia Kerr साठी निम्मी पर्स केली रिकामी
17
याला म्हणतात ढासू शेअर...! 5 वर्षांत 2 रुपयांच्या स्टॉकनं केलं करोडपती, दिला 93806.67% चा बंपर परतावा
18
भयानक...! हाँगकाँगच्या गगनचुंबी आगीत अद्याप २७९ हून अधिक लोक बेपत्ता; ५५ मृतदेह सापडले, ७६ गंभीर...
19
वळणावर 'ती' ट्रेन आली अन् होत्याचं नव्हतं झालं; चीनमध्ये रेल्वे अपघातात ११ कर्मचाऱ्यांचा मृत्यू
20
मिठी मारली, कपाळाचं चुंबन घेतलं अन् गळ्यावर फिरवला...; नववधूला प्रियकरानेच क्रूरपणे संपवले!
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत मोबाइल शॉपीला भीषण आग, एक कोटीचे साहित्य जळून खाक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 16:55 IST

तासभराच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले

सांगली : शहरातील आझाद चौकातील शिव मेरिडियन व्यापारी संकुलातील नवतरंग मोबाइल शोरूमला गुरुवारी पहाटे साडेचारच्या सुमारास भीषण आग लागली. पहिल्या मजल्यावर लागलेल्या आगीने काही क्षणातच रौद्ररूप धारण केले. मोबाइल, कॉम्प्युटर, लॅपटॉप, लाखोंचे एलईडी स्क्रीन असे एक कोटी रुपयांचे साहित्य जळून खाक झाले.महापालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत तासाभराच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. ही आग इन्व्हर्टर शॉर्टसर्किटमुळे लागण्याचा प्राथमिक अंदाज असून, या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.याबाबत अधिक माहिती अशी की, शिव मेरिडियन संकुलात अनेक मोबाइल व ॲक्सेसरिज विक्रीची दुकाने, हाॅटेल, फायनान्स कंपन्यांची कार्यालये आहेत. याच इमारती पहिल्या मजल्यावर वीरेंद्र यड्रावे यांच्या मालकीचे अण्णाज नवतरंग मोबाइल शॉपी नावाने मोबाइलचे दुकान आहे. गुरुवारी पहाटे साडेचारच्या सुमारास अचानक दुकानाच्या पहिल्या मजल्यातून धुराचे लोट बाहेर येऊ लागले. ही बाब हाॅटेल कर्मचारी व वाॅचमन नजीर हुसेन मुलाणी यांनी पाहिली. त्यांनी तातडीने दुकान मालक आणि महापालिकेच्या अग्निशमन पथकाला आगीची माहिती दिली. महापालिकेच्या अग्निशमनच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन विभागाचे प्रमुख सुनील माळी, फायरमन धीरज पावणे, प्रसाद माने, अण्णासाहेब देशमुख, ओंकार ऐतवडे, उमेश सरवदे, देविदास मानकरी, विजय कांबळे यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. तासभराच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.या आगीत दुकानाच्या पहिल्या मजल्यावर रेडमी कंपनीचे १२० मोबाइल, चार संगणक, लॅपटॉप, सोफासेट, दुकानाच्या दर्शनी भागात असलेला ९ लाखांचा एलईडी स्क्रीन, दुकानावरील एलईडी बोर्ड यासह इतर साहित्य भक्षस्थानी पडले होते. आगीत एक कोटीचे नुकसान झाले असून, ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Massive Fire Engulfs Mobile Shop in Sangli, Crores Lost

Web Summary : A fire broke out at a mobile shop in Sangli's Azad Chowk, causing an estimated loss of one crore rupees. The fire, suspected to be caused by an inverter short circuit, destroyed mobiles, computers, laptops, and an LED screen. Firefighters extinguished the blaze after an hour.