शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

Sangli: दोघा भावांचा अल्पवयीन मुलींशी विवाह, विवाह पथकाला धक्काबुक्की

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2024 15:44 IST

पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत कार्यकर्त्यांची सुटका केली

सांगली : मिरज तालुक्यातील एका गावात बालविवाह सुरू असल्याची माहिती चाइल्ड लाइन संस्थेला मिळाली. तो थांबविण्यासाठी धावलेल्या कार्यकर्त्यांना संतप्त जमावाने धक्काबुक्की केली. संजयनगर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत कार्यकर्त्यांची सुटका केली.बालकल्याण समितीच्या आदेशानंतर तातडीने गुन्हा दाखल केला जाईल, अशी माहिती निरीक्षक बयाजीराव कुरळे यांनी दिली. या गावातील दोघा भावांचा दोन अल्पवयीन मुलीशी विवाह नियोजित होता. ही माहिती चाइल्ड लाइन संस्थेला हेल्पलाइनद्वारे मिळाली. त्यांनी तातडीने बालकल्याण समितीला माहिती दिली. त्यांच्या निर्देशानुसार विवाहस्थळी पथक दाखल झाले. तत्पूर्वीच विवाह संपन्न झाला होता. चाइल्ड लाइन टीमने चित्रीकरणाला सुरुवात केली. त्यावेळी नातेवाइकांनी धक्काबुक्की केली. याची माहिती मिळताच पोलिसांचे पथक दाखल झाले. त्यानंतर बालकल्याण समितीकडे सारी माहिती देण्यात आली. चाइल्ड लाइनचे प्रियांका माने, मिनाज शेख, शानुर दांनवाडे, विशाल पाटोळे, आरती निडसोशे, इम्तियाज हकीम यांनी विवाह रोखण्याचा प्रयत्न केला.

टॅग्स :Sangliसांगलीmarriageलग्नCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस