शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
3
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
4
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
5
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
6
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
7
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
8
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
9
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
10
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
11
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
12
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
13
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
14
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
15
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
16
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
17
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
18
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
19
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
20
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?

सांगलीत २३ जानेवारीला मराठा समाजाचा आक्रोश मोर्चा

By अशोक डोंबाळे | Updated: January 14, 2025 15:44 IST

सोनावणे, धस, क्षीरसागर होणार मोर्चात सहभागी

सांगली : मस्साजोग (जि. बीड) येथील सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख व परभणीचे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या खुनाच्या निषेधार्थ दि. २३ जानेवारी रोजी सांगलीत आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात जिल्ह्यातील सर्व बहुजन समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मराठा समाजातर्फे केले आहे.मोर्चा काढण्यासाठीच्या नियोजनासाठी सांगलीत मंगळवारी मराठा समाज भवन येथे बैठक झाली. या बैठकीला अखिल भारतीय मराठा महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष विलास देसाई, मराठा क्रांती मोर्चाचे डॉ. संजय पाटील, अभिजीत पाटील, दिग्विजय पाटील, तानाजी चव्हाण, विजय धुमाळ, तानाजी भोसले, दादासाहेब पाटील, मच्छिंद्र बाबर, संभाजी पाटील, आदींसह समाज बांधव मोठ्या संख्येन उपस्थित होते.या बैठकीमध्ये सांगलीत दि. २३ जानेवारीला मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. या मोर्चास आक्रोश मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. या आक्रोश मोर्चास स्वर्गीय संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख, कन्या वैभवी देशमुख व त्यांचे कुटुंबीय, खासदार बजरंग सोनावणे, आमदार सुरेश धस, आमदार संदीप क्षीरसागर हे मोर्चामध्ये सहभागी होऊन उपस्थितांना संबोधित करणार आहेत. या मोर्चात सर्व समाजातील समाज बांधवांना मोठ्या संख्येने सहभागी करून घेण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला.या आक्रोश मोर्चाच्या नियोजिनासाठी दि. १७ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता सांगलीत मराठा समाज येथे सर्व बहुजन समाजातील बांधवांची बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीला जिल्ह्यातील सर्व सामाजिक संस्था, संघटना, सर्व समाजाच्या संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन मराठा समाजातर्फे करण्यात आले आहे.

सोनावणे, धस, क्षीरसागर होणार मोर्चात सहभागीआक्रोश मोर्चास स्वर्गीय संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख, कन्या वैभवी देशमुख व त्यांचे कुटुंबीय, खासदार बजरंग सोनावणे, आमदार सुरेश धस, आमदार संदीप क्षीरसागर आदी प्रमुख मोर्चामध्ये सहभागी होऊन उपस्थितांना संबोधित करणार आहेत.

टॅग्स :Sangliसांगलीmarathaमराठाagitationआंदोलनsarpanchसरपंच