शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या सामुद्रधुनीत खळबळ! अमेरिकेचे 'फ्लाईंग गॅस स्टेशन' कतारजवळ बेपत्ता; संकटकालीन संदेशानंतर संपर्क तुटला
2
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्येही भाजपाचे धक्कातंत्र? मुख्यमंत्रिपदासाठी 'दिल्ली पॅटर्न'?
3
धक्कादायक! एक बायको अन् ९ नवरे...; ज्या युवतीसोबत लग्न झालं, तिने आधीच ८ जणांशी लग्न केले होते
4
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; ₹१,५१,८०९ वर आलं गोल्ड; ₹६०७९ नं महागली चांदी, मध्य पूर्वीतील तणाव कमी होण्याचा परिणाम
5
Stock Market Today: सेन्सेक्स ४०७ आणि निफ्टी १३८ अंकांच्या तेजीसह खुला; 'या' शेअर्सनं केली जबरदस्त सुरुवात
6
अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... 
7
६ राज्ये, १९ जिल्हे आणि ८३ लाख लोकांना थेट फायदा; ₹२३,४०० कोटींमध्ये रेल्वे करणार 'हे' महत्त्वाचं काम
8
Ear Piercing: बाळाचे कान टोचण्यामागची 'ही' वैज्ञानिक कारणे तुम्हाला माहीत आहेत का?
9
पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला
10
नसरापूर प्रकरण: …तर राज ठाकरेंवर दाखल होऊ शकतो गुन्हा, असीम सरोदेंचा दावा
11
४ वेळा SSC, दोनदा UPSC दिली, आजारपणातही जिद्द नाही सोडली, शेतकऱ्याचा मुलगा बनला CBI अधिकारी
12
'प्रोजेक्ट फ्रीडम' बंद, होर्मुझमधील जहाजांना यापुढे सुरक्षा देणार नाही; ट्रम्प यांची मोठी घोषणा
13
डॉ. संग्राम पाटील यांचा यूकेमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा; हायकोर्टाने दिला दिलासा, काय म्हटलं?
14
प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितलं इंडस्ट्रीतलं वास्तव, म्हणाली, "किसींग सीनला नकार, थकलेले मानधन..."
15
ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार?
16
Multibagger Stock : १ लाखाचे बनले ३ कोटी रुपये; या शेअरनं दिला ३१०००% पेक्षा अधिक रिटर्न, एकेकाळी ₹१० पेक्षा कमी होती किंमत
17
Palghar Crime: अघोरी पूजेसाठी बोलावले अन् १३ वर्षाच्या मुलीवर भोंदूबाबाने केला बलात्कार, पालघर हादरले
18
Samudrik Shastra: गालावरची खळी: केवळ सौंदर्य की भाग्याचं लक्षण? सामुद्रिक शास्त्र काय सांगते?
Daily Top 2Weekly Top 5

मनप्रीतसिंगची ‘बाला’वर मात

By admin | Updated: April 28, 2015 23:44 IST

नेवरीत मैदान : हजारो कुस्ती शौकिनांची हजेरी

नेवरी : नेवरी (ता. कडेगाव) येथे सिद्धनाथ यात्रा कमिटीने आयोजित केलेल्या कुस्ती मैदानात पंजाबकेसरी मनप्रीतसिंगने हिंदकेसरी गणपतराव आंदळकर यांचा पठ्ठ्या बाला रफिकला अवघ्या साडेचार मिनिटांत उलटी डावावर अस्मान दाखवून दीड लाख रुपयाचे पहिले बक्षीस पटकावले. येथे सिद्धनाथ यात्रेनिमित्त छत्रपती शिवाजीराजे क्रीडांगणावर कुस्त्या आयोजित करण्यात आल्या होत्या. मनप्रीतसिंग व बाला रफिक यांच्यात पहिल्या क्रमाकांची लक्षवेधी लढत झाली. खासदार संजयकाका पाटील, डबल महाराष्ट्रकेसरी चंद्रहार पाटील, कडेगावचे पोलीस निरीक्षक अशोक कदम यांच्या हस्ते कुस्ती लावण्यात आली. बाला रफिकने सुरुवातीलाच मनप्रीतसिंगवर ताबा घेतला होता; मात्र काही क्षणातच मनप्रीतसिंगने उलटी डावावर बाला रफिकला अस्मान दाखविले. व्दितीय क्रमांसासाठी राजाराम यमगर विरुध्द वसंत खेचे यांच्यात एक लाख इनामाची कुस्ती झाली. यामध्ये यमगरने खेचेवर ताबा मिळवत कुस्ती जिंकली. तृतीय क्रमांकासाठी आप्पा बुटे विरुध्द रहीम खान यांच्या कुस्तीसाठी ७५ हजार रुपयांचे बक्षीस होते. आप्पा बुटेने रहीम खानचा अंदाज घेत त्याला अस्मान दाखविले. मैदानात लहान-मोठ्या एकूण १३० कुस्त्या पार पडल्या. वैयक्तिक व यात्रा कमिटीकडून कुस्त्यांसाठी साडेतीन लाखाची बक्षिसे देण्यात आली. या मैदानास कडेगावचे तहसीलदार हेमंत निकम, संतोष वेताळ आदींसह भागातील सर्व कुस्ती शौकीन व वस्ताद मंडळींनी भेट दिली. तब्बल २५० ते ३०० मल्ल या मैदानात उपस्थित होते. मधुकर कांबळे, शिवाजी महाडिक, रंगराव महाडिक, संतोषशेठ महाडिक, जालिंदर महाडिक, इंद्रजित साळुंखे, संजय विभूते, एच.डी. महाडिक, मधुकर महाडिक, अशोक चव्हाण, राहुल महाडिक, सरपंच बाळासाहेब महाडिक, आदी उपस्थित होते. सुरेश गवळी यांनी समालोचन केले. (वार्ताहर)