शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: पलूसचा मंडल अधिकारी ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2024 11:53 IST

साथीदार रंगेहाथ सापडला : तहसील कार्यालयात कारवाई

सांगली : खरेदी केलेल्या जमिनीची पलूसच्या तलाठ्यांनी घेतलेली नोंद मंजूर करण्यासाठी ७ हजार ५०० रुपयांची लाच स्वीकारताना पलूसच्या मंडल अधिकाऱ्यांच्या मदतनिसाला रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई मंगळवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली.लाच स्वीकारण्यास प्रोत्साहन दिल्याचे निष्पन्न झाल्याने मंडल अधिकाऱ्यासही ताब्यात घेण्यात आले. मंडल अधिकारी तानाजी शामराव पवार (वय ५२, रा. पवार गल्ली, कणेगाव, ता. वाळवा) आणि मदतनीस प्रसाद गजानन चव्हाण (वय ५४, रा. आमणापूर रस्ता, बुर्ली, ता. पलूस) अशी संशयितांची नावे आहेत.तक्रारदाराच्या मित्राने खरेदी केलेल्या जमिनीची पलूसच्या तलाठ्यांनी घेतलेली नोंद मंजूर करण्यासाठी मंडल अधिकारी तानाजी पवार याचा मदतनीस प्रसाद चव्हाण याने तक्रारदाराकडे १० हजार रुपयांची मागणी केल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागास प्राप्त झाली. अधिकाऱ्यांनी तक्रारीची पडताळणी केली असता त्यामध्ये तथ्य असल्याचे आढळले. दरम्यान, तडजोडीत लाचेची रक्कम ७ हजार ५०० रुपये देण्याचे ठरले. मंगळवार, दि. १४ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने तहसील कार्यालय आवारात सापळा लावला. तेथे मदतनीस प्रसाद चव्हाण याने तक्रारदाराकडून लाचेची रक्कम स्वीकारली. त्यास रंगेहाथ पकडण्यात आले. तपासात लाच स्वीकारण्यास मंडल अधिकारी तानाजी पवार याने प्रोत्साहन दिल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे दोघांनाही ताब्यात घेण्यात आले. संशयितांविरोधात पलूस पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :SangliसांगलीBribe Caseलाच प्रकरणCrime Newsगुन्हेगारीAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग