शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसेसोबत जाण्याची काँग्रेस कार्यकर्त्यांची इच्छा नाही; हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
2
षडयंत्र! दररोज ४० मिनिटे जिहाद ट्रेनिंग; ५०० रूपयांत दहशतवादी मसूद अजहरची बहीण चालवतेय कोर्स
3
'पीएम मोदी गोष्टी लपवतात; ट्रम्प त्या उघड करतात', रशियन तेल खरेदीवरुन काँग्रेसचे टीकास्त्र
4
फरार मेहुल चोक्सीला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा; बेल्जियम कोर्टाची प्रत्यर्पणास मंजुरी
5
तब्बल ५५०० किलो सोन्यातून उजळले भगवान बुद्ध; एका चुकीने उलगडलं कित्येक दशक दडलेले 'रहस्य'?
6
"अक्षय कुमार सध्या डिप्रेशनमध्ये आहे, कारण..."; 'हेरा फेरी'चे दिग्दर्शक प्रियदर्शन यांचा मोठा खुलासा
7
शौक बड़ी चीज है! दृष्टी गमावताच डोळ्यात बसवला २ कॅरेटचा हिरा, रंगली तुफान चर्चा
8
‘निवडणुका जवळ आल्याने सत्ताधारी आमदारांना निधीच्या रूपात वाटली जातेय खैरात’, काँग्रेसचा आरोप
9
मारुतीच्या पहिल्या इलेक्ट्रिक SUV ची प्रतीक्षा संपली, डिसेंबरमध्ये होणार लाँच, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स
10
हृदयस्पर्शी! आधी लेक गमावली, मुलालाही झाला तोच आजार; आईने लिव्हर देऊन वाचवला जीव
11
काय सांगता? स्मृती इराणींच्या 'या' मालिकेत झळकणार बिल गेट्स; कोणतं पात्र साकारणार?
12
अवघी ४० हजार लोकसंख्या, एकही विमानतळ नाही! तरीही जगातील श्रीमंत देशांच्या यादीत 'हा' देश कसा?
13
दिवाळीला रितेश देशमुख कुटुंबापासून दूर, मुलांनी लिहिलेलं पत्र वाचून म्हणाला, "और जीने को..."
14
फ्रान्सच्या संग्रहालयात 'धूम' स्टाईल चोरी; ८०० कोटींचे दागिने घेऊन चोर फरार; ७ मिनिटांत झाला 'गेम'
15
आघाडीबाबत भाई जगताप यांच्या विधानामुळे मविआत फटाके, नंतर स्पष्टीकरण देत म्हणाले...
16
Neeraj Chopra Lieutenant Colonel : राजनाथ सिंह अन् सेनाप्रमुखांकडून 'गोल्डन बॉय'चा सन्मान (VIDEO)
17
अंतर्गत मतभेदांदरम्यान टाटा ट्रस्ट्सनं वेणू श्रीनिवासन यांची आजीवन विश्वस्त म्हणून केली नियुक्ती; आता मेहली मिस्त्री यांच्यावर नजर
18
मोठी बातमी! सोन्या-चांदीचा बुडबुडा फुटला....! एकच झटक्यात सोनं 3725 तर चांदी 10549 रुपयांनी स्वस्त! जाणून घ्या कारण
19
भारी! WhatsApp, Instagram चॅटिंग होणार सुरक्षित; स्कॅम रोखण्यासाठी मेटाने आणलं नवीन टूल
20
हिऱ्याच्या खरेदीपूर्वी ‘हे’ चार नियम माहीत करून घ्या! कट, क्लॅरिटी, कलर, कॅरेटचा फॉर्म्युला काय सांगतो?

Sangli Crime: महिलेच्या खुनाचा प्रयत्न, आरोपीस १० वर्षांचा कारावास

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 15:20 IST

माझ्या आई-वडिलांकडे पैसे मागितल्याची तक्रार का केलीस, असे म्हणत तिच्या डोक्यावर आणि हातावर कोयत्याने वार करून तिच्या खुनाचा प्रयत्न केला होता

इस्लामपूर : आष्टा (ता.वाळवा) येथे जनावरांसाठी चारा आणण्यासाठी गेलेल्या महिलेवर कोयत्याने हल्ला चढवत तिच्या खुनाचा प्रयत्न करत सोन्याचे दागिने लुटल्याप्रकरणीच्या आरोपीस दोषी ठरवून न्यायालयाने १० वर्षांचा कारावास आणि २५ हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली.रोहित आनंदराव पवार (वय ३५, रा. आष्टा) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयातील पहिले जिल्हा न्यायाधीश अनिरूद्ध गांधी यांनी आरोपीस विविध कलमांखाली दोषी धरून शिक्षा दिली. अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील रणजित पाटील यांनी फिर्यादीतर्फे काम पाहिले.फेब्रुवारी २०२० रोजी दुपारी धानव्वा रेवाप्पा हिरेमठ (वय ४३) ही महिला जनावरांना चारा आणण्यासाठी आप्पा नायकवडी यांच्या शेतामध्ये गेली होती. धानव्वा या उसाचा पाला काढत असताना पाठीमागून कोयता घेऊन आलेल्या रोहित पवार याने माझ्या आई-वडिलांकडे पैसे मागितल्याची तक्रार का केलीस, असे म्हणत तिच्या डोक्यावर आणि हातावर कोयत्याने वार करून तिच्या खुनाचा प्रयत्न केला.याचवेळी तिच्या अंगावरील ४५ हजार रूपये किमतीचे सोन्याचे दागिने जबरदस्तीने चोरून पलायन केले होते. याप्रकरणी आष्टा पोलिसात रोहित पवार याच्याविरूद्ध खुनाच्या प्रयत्नासह जबरी चोरी आणि भारतीय हत्यार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा नोंद झाला होता.

या खटल्याची सुनावणी न्यायाधीश गांधी यांच्यासमोर झाली. त्यामध्ये सरकार पक्षातर्फे ॲड. पाटील यांनी आठ साक्षीदार तपासले. त्यातील तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक दीपक सदामते, वैद्यकीय अधिकारी डॉ. अविनाश पाटील यांच्यासह फिर्यादी आणि पंचाच्या साक्षी ग्राह्य मानून न्यायालयाने शिक्षा सुनावली. खटल्यात पैरवी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत कांबळे, हवालदार उत्तम शिंदे, चंद्रशेखर बकरे यांनी सरकार पक्षाला मदत केली.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसCourtन्यायालय