मिरज: महापालिका निवडणुकीचा प्रचार सुरु असताना मिरजेतील राष्ट्रवादी काँग्रेसअजित पवार गटाचे उमेदवार आझम काझी यांच्यासह आठ जणांना सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. उद्या शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मिरज दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर तयारी सुरू असताना पोलिस अधीक्षकांनी ही कारवाई केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
मिरजेत प्रभाग क्रमांक सहामधून राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका रजिया काझी यांचे पुत्र आझम काझी यांना माजी महापौर मैनुद्दीन बागवान, जरीना बागवान आणि नर्गिस सय्यद यांच्यासह राष्ट्रवादी अजित पवार गटातर्फे उमेदवारी देण्यात आली आहे. सुमारे एक वर्षापूर्वी मिरजेत स्टेशन रोड परिसरात व्यावसायिक वादातून अफगाण हॉटेलवर हल्ला करून तोडफोड केल्याप्रकरणी आझम काझी यांच्यासह असलम काझी, शोएब काझी, मतीन काझी, अक्रम काझी, रमेश कुंजीरे, अल्ताफ रोहिले व मोहसिन गोदड यांच्याविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल आहे.
या गुन्हेगारी कृत्यांच्या पार्श्वभूमीवर आझम काझी व इतर आरोपींविरोधात पोलिस अधीक्षकांकडे हद्दपारीचा प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. या प्रस्तावानुसार पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी आझम काझी यांच्यासह आठ जणांना सांगली व कोल्हापूर या दोन जिल्ह्यांतून एक वर्षासाठी हद्दपार करण्याचा आदेश दिला आहे. या कारवाईमुळे निवडणूक प्रचारावर व स्थानिक राजकारणावर काय परिणाम होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Web Summary : Nationalist Congress Party (Ajit Pawar faction) candidate Azam Kazi and eight others have been expelled from Sangli and Kolhapur districts for one year due to past criminal activities. This action by the police superintendent comes ahead of Deputy Chief Minister Ajit Pawar's Miraj visit, causing a stir in political circles.
Web Summary : राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी (अजित पवार गुट) के उम्मीदवार आज़म काज़ी और आठ अन्य को पिछली आपराधिक गतिविधियों के कारण सांगली और कोल्हापुर जिलों से एक वर्ष के लिए निष्कासित कर दिया गया है। पुलिस अधीक्षक द्वारा यह कार्रवाई उपमुख्यमंत्री अजित पवार की मिराज यात्रा से पहले की गई है, जिससे राजनीतिक हलकों में खलबली मच गई है।