शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'बदनामीच्या राजकारणाला लोक उत्तर देतील', पैसे वाटल्याच्या आरोपाला रोहित पाटलांचे प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2024 13:54 IST

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: तासगाव विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार संजयकाका पाटील यांनी रोहित पाटील यांच्या पैसे वाटल्याचा आरोप केला.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ): विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरूवात झाली आहे. उमेदवारांनी प्रचारासाठी मोठी तयारी केली आहे. दरम्यान, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांनी मतदारांना घरोघरी भेटी देऊन दिवाळीच्या शुभेच्छा देत आहेत. दरम्यान, काल रोहित पाटलांचे कार्यकर्ते फराळाच्या बॉक्समधून तीन हजार रुपये वाटत असताना रंगेहाथ पकडण्यात आल्याचा दावा माजी खासदार संजयकाका पाटील यांनी केला आहे. दरम्यान, आता या आरोपाला रोहित पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 

निकालानंतर अजित पवार भाजपाबरोबरच असतील, हे सांगणे कठीण; नवाब मलिक यांच्या दाव्याने खळबळ

माजी खासदार संजयकाका पाटील यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार रोहित पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तासगाव विधानसभा मतदारसंघात एक गावात रोहित पाटलांचे कार्यकर्ते दिवाळी फराळच्या बॉक्समध्ये पैसे वाटत असल्याचा आरोप केला आहे. या आरोपांना प्रत्युत्तर देताना रोहित पाटील म्हणाले, 'काल तासगावला घडलेला प्रकार अत्यंत निंदनीय आहे. माझं नाव घेण्यासाठी काय पराकोटीचे दडपण संबंधित व्यक्तीवर टाकले याची काही माहिती आम्हाला मिळते. तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात अशापद्धतीचा प्रकार संजयकाका  पहिल्यांदा करतात असंही नाही. ते कुठल्या पातळीला जातील हे लोकांना माहित आहे आणि माझ्या लोकांना माझ्यावर विश्वास आहे, अशी प्रतिक्रिया रोहित पाटील यांनी दिली. 

"पाच वर्षे काम करणाऱ्याला असल्या गोष्टी करायची गरज नसते. मी पाच वर्षे काम केले आहे हे लोकांना माहित आहे. त्यांनी केलेले नाही हे लोकांना माहित आहे, अशा पद्धतीने बदनामीचे राजकारण कोण करत आहे हे लोकांना माहित आहे लोक त्याला उत्तर देतील, असं प्रत्युत्तर रोहित पाटील यांनी माजी खासदार संजयकाका पाटील यांना दिले. 

माजी खासदार संजयकाका पाटलांचे आरोप काय?

काल तासगावमध्ये दिवाळी फराळामध्ये तीन हजार रुपये वाटल्याची घटना समोर आली. हे कार्यकर्ते रोहित पाटील यांचे असल्याचा आरोप संजयकाका पाटील यांनी केला. संजयकाकांनी यावेळी रोहित पवार यांच्यावर टीका केली. संजयकाका पाटील म्हणाले,'निवडणुकीमध्ये सहानुभूतीच राजकारण करणाऱ्या रोहित पाटलांचा खरा चेहरा आता जनतेसमोर आला आहे. जनता अशा लोकांना धडा शिकवेल. प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाल्यास हजारो लोक पोलीस ठाण्यासमोर येऊन बसणार असल्याचा इशारा संजयकाका पाटलांनी दिला आहे'.  

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४SangliसांगलीElectionनिवडणूक 2024Rohit Patilरोहित पाटिलtasgaon-kavathe-mahankal-acतासगाव-कवठेमहांकाळsanjaykaka patilसंजयकाका पाटील