शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणं युद्धासारखंच!
2
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
3
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
4
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
5
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
6
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
7
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
8
पहलगाम हल्ल्यानंतर भारतात होणारी मोठी स्पर्धा पुढे ढकलली
9
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
10
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
11
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
12
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
13
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
14
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
15
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
16
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
17
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
18
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
19
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
20
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान

Maharashtra Election 2019: ...त्यांनी एक मारला, तर आम्ही १० मारू; अमित शहा यांनी पाकिस्तानला ठणकावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2019 06:25 IST

अमित शहा सध्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी महाराष्ट्रामध्ये आले आहेत.

जत (जि. सांगली) : काश्मीर खोऱ्यात सर्वत्र शांतता आहे. मात्र पाकिस्तान कुरघोडी करू पाहत आहे. मात्र त्यांच्याकडून आमचा एक जवान शहीद झाला तरी आम्ही त्यांचे दहा सैनिक मारू, अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री व भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी गुरुवारी पाकिस्तानला ठणकावले. ते प्रचारसभेत बोलत होते. 

अमित शहा सध्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी महाराष्ट्रामध्ये आले आहेत. त्यांनी आज जत, तुळजापूर, अक्कलकोट, किल्लारी, औसा (लातूर) आदी ठिकाणच्या जाहीर सभांमधून काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, राष्टÑवादीचे नेते शरद पवार यांच्यावर सडकून टीका केली. लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष महत्त्वाचा असतो. पण महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणूक काळामध्ये काँग्रेस पक्ष दिसत नाही. तो पक्ष जणू निवडणुकांपासून पळ काढत आहे, अशी टीका शहा यांनी केली.

अमित शहा म्हणाले, राहुल गांधी हे मैदान सोडून बाहेर गेले आहेत. तसेच ३७० कलम, तिहेरी तलाक व काश्मीर प्रश्न या विषयांसंदर्भात शरद पवार यांनी भूमिका जाहीर करावी, असे आव्हानही भाजपाध्यक्षांनी जाहीर सभांमधून दिले. देवेंद्र फडणवीस सरकारची पाठराखण करताना ते म्हणाले, मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्याची आर्थिक पत वाढवली आहे.

काँग्रेसच्या काळात वसंतराव नाईक यांच्याखेरीज एकाही मुख्यमंत्र्याला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करता आला नव्हता. परंतु देवेंद्र फडणवीस पाच वर्षे मुख्यमंत्रिपदी राहिले. यापुढेही तेच मुख्यमंत्री राहतील. विधानसभेतील २८८ पैकी २२२ जागा भाजप व मित्रपक्षांनामिळतील, असा दावा सभांमधून अमित शहा यांनी केला. अमित शहा महाराष्ट्रामध्ये आणखी काही सभा घेणार आहेत.जागतिक पातळीवर पाकिस्तान एकाकीकाश्मीर प्रश्नावरून पाकिस्तान जागतिक पातळीवर एकाकी पडला आहे. संपूर्ण काश्मीर शांत आहे; परंतु काश्मीरमध्ये अशांतता निर्माण झाली आहे, असा विरोधकांकडून अपप्रचार केला जात आहे. मागील ७० वर्षांपासून काश्मीरचा प्रश्न प्रलंबित होता. तो भारताचा एक अविभाज्य भाग असून, दोन झेंडे, दोन नियम देशात असू शकत नाहीत. देशात पूर्ण बहुमत मिळाल्यानंतर आम्ही सरदार वल्लभभाई पटेल यांचे अखंड भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी काश्मीरचा निर्णय घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला सुरक्षित ठेवले आहे.

टॅग्स :Amit Shahअमित शहाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Sangliसांगली