शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

Sangli: शिराळा मतदारसंघात महाडिक-देशमुख यांच्यात रस्सीखेच; महायुतीत बंडखोरीची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2024 18:16 IST

उमेदवारी जाहीर झाल्यावर लढत दुरंगी की तिरंगी होणार याचे चित्र स्पष्ट होणार

विकास शहाशिराळा : शिराळा विधानसभा मतदारसंघात राजकीय वातावरण तापले आहे. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार मानसिंगराव नाईक यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. मात्र, विरोधात भाजप महायुतीचे सत्यजित देशमुख की सम्राट महाडिक यापैकी कोण यामध्ये अद्याप निर्णय झालेला नाही. ही उमेदवारी जाहीर झाल्यावर बंडखोरीची शक्यता आहे. त्यानंतर मतदारसंघात ही लढत दुरंगी की तिरंगी होणार याचे चित्र स्पष्ट होणार आहे.भाजपच्या उमेदवारीसाठी महाडिक व देशमुख हे मुंबईत ठाण मांडून आहेत. यातच महायुतीतील उपमुख्यमंत्री अजित पवार गटानेही या जागेवर दावा केला आहे. या मतदारसंघात संपूर्ण शिराळा तालुका व वाळवा तालुक्यातील ४८ गावांचा समावेश आहे. ४८ गावांत शरदचंद्र पवार गटाचे माजी मंत्री जयंत पाटील व माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांची ताकद आहे.२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवाजीराव नाईक भाजपचे उमेदवार होते. त्यावेळी सम्राट महाडिक यांनी बंडखोरी केली होती. महाडिक हे अपक्ष लढूनही त्यांना ४६ हजार मतदान झाले होते. यावेळी भाजपला भगतसिंग नाईक यांची ताकद मिळणार आहे. त्यामुळे भाजपच्या उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू आहे.

महाडिक व देशमुख यांच्यात रस्सीखेचभाजप उमेदवार कोण हे अद्याप ठरले नाही. मात्र, देशमुख किंवा महाडिक दोन्ही गटांकडून उमेदवारी आपल्यालाच मिळेल, असा दावा केला जातोय. मात्र, यावेळी बंडखोरी करणार नसल्याचे दोन्ही इच्छुकांनी आश्वासन दिले आहे. मात्र, सभांमध्ये सहकारी संस्थांचा कारभार, वाकुर्डे योजनेची विकासकामे यावरून एकमेकांवर टीकाटिप्पणी सुरू आहे. कार्यकर्त्यांच्या रोज इकडून तिकडे उड्या सुरू असल्याने दिवसागणिक राजकारण तापत चालले आहे.

  • मतदारसंघात पुरुष मतदार : १ लाख ५४ हजार ७१९
  • महिला मतदार संख्या : १ लाख ४८ हजार ८०४
  • तृतीयपंथी : ३
  • एकूण मतदार संख्या- ३ लाख ३ हजार ५२६

२०१९ शिराळा विधानसभेत मिळालेली मते

  • मानसिंग फत्तेसिंगराव नाईक (राष्ट्रवादी) १,०१,९३३
  • शिवाजीराव यशवंतराव नाईक (भाजप) ७६,००२
  • सम्राट नानासाहेब महाडिक (अपक्ष) ४६,२३९

२०२४ हातकणंगले लोकसभेतील शिराळा विधानसभेतील मताधिक्य..

  • धैर्यशील माने - ८०,७२०
  • सत्यजित पाटील - ९०,००१
  • राजू शेट्टी - १७,४९९
टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४shirala-acशिराळाMahavikas Aghadiमहाविकास आघाडीMahayutiमहायुती