शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan Sabha Election 2024: इस्लामपूर, शिराळा मतदारसंघात गोड साखरेचे कडू राजकारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2024 14:31 IST

विविध पक्षांचा जाहीरनामा अन् आरोप-प्रत्यारोप रंगले

अशोक पाटीलइस्लामपूर : इस्लामपूरशिराळा या दोन मतदारसंघावर साखर सम्राटांचे वर्चस्व आहे. याच साखरपट्ट्यात उत्पादित ऊस दराचा मुद्दा ऐन प्रचारसभेत ऐरणीवर आला आहे. दराच्या प्रश्नावरून एकमेकांना घेरण्याची रणनिती सुरू आहे. त्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीत गोड साखरेचे कडू राजकारण सुरू आहे.इस्लामपूर व शिराळा या मतदारसंघात एकास-एक लढत आहे. संघर्षमय लढतीमध्ये विविध पक्षांचे नेते आमने-सामने उभे ठाकले आहेत. विविध नेत्यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्यातच कोलांटउड्या मारणाऱ्या कार्यकर्त्यांचा भाव वधारला आहे.इस्लामपूर मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुतीत काट्याची टक्कर आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार व राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी ऊस उत्पादकांची सलगी आहे. त्यामुळेच इस्लामपूर मतदारसंघात विरोधकांनी ऊस दराचा मुद्दा उचलून धरला आहे. राज्यातील इतर साखर कारखान्यापेक्षा उतारा जास्त असून, येथे ऊसाचा भाव कमी का ? असा मुद्दा नव्याने उपस्थित करण्यात आला आहे.

या मतदारसंघात महायुतीकडे हुतात्मा संकुलनाचे गौरव नायकवडी आहेत. परंतु, हुतात्मा साखर कारखान्याचे अध्यक्ष वैभव नायकवडी यांची भूमिका आजही गुलदस्त्यात आहे. महायुतीमध्ये विविध पक्षांच्या नेत्यांचा वेगवेगळा अजेंडा आहे. त्यामुळेच इस्लामपूर मतदारसंघात नेत्यांमधील आरोप-प्रत्यारोपांनी वातावरण तापले आहे. सत्ताधारी साखर सम्राटांचे नेते म्हणून जयंत पाटील यांच्या विरोधात ऊस दराचा मुद्दा उचलून धरला जात आहे.

शिराळ्यातही कारखानदार आमने-सामने ..अशीच अवस्था शिराळा मतदारसंघात आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार मानसिंगराव नाईक यांच्या विरोधात भाजपने उमेदवार दिला आहे. नाईक यांच्याकडे साखर कारखाना आहे. त्यामुळेच ऊस उत्पादकांची ताकद नाईक यांच्या पाठीशी आहे. परंतु, भाजपनेही साखर उद्योगातील सत्यजित देशमुख यांना उमेदवारी दिली, तर त्यांच्याशी वारणा खोऱ्यातील साखर सम्राट आमदार विनय कोरे यांची सलगी आहे. साखर कारखानदारांमध्ये दरवेळी दराच्या बाबतीत होणारी युती यंदा निवडणुकीमुळे विभागली गेली आहे. त्यातच साखर दराच्या मुद्यावरून गोड साखरेचे कडू राजकारण आता सुरू आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४islampur-acइस्लामपूरshirala-acशिराळाJayant Patilजयंत पाटीलVinay Koreविनय कोरेwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024