शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

विश्वजीत कदम, शरद लाड यांचे अखेर मनोमिलन; काही दिवसांपासून रंगले होते मानापमान नाट्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2024 18:20 IST

अन्याय होणार नाही, याची काळजी घेऊ

पलूस : पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार आमदार विश्वजीत कदम, राष्ट्रवादीचे आमदार अरुण लाड, शरद लाड हे पलूस येथील राष्ट्रवादीच्या मेळाव्यात एकाच व्यासपीठावर दिसले. त्यांच्यात अखेर मनोमिलन झाल्याचे दिसून आले.काँग्रेस व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात गेल्या काही दिवसांपासून मानापमान नाट्य रंगले होते. विश्वजीत कदम व शरद लाड यांनी निवडणुकीतील प्रचार सहभागावरून वेगवेगळ्या भूमिका स्पष्ट केल्या होत्या. त्यामुळे महाविकास आघाडीतील घटकपक्ष व त्यांच्या कार्यकर्त्यांत संभ्रम निर्माण झाला होता. अखेर दोन्ही नेत्यांमध्ये मनोमिलन झाले आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व खासदार सुप्रिया सुळे यांनी दोन्ही नेत्यांची समजूत घालत आघाडी धर्म पाळण्याची सूचना केली. यामुळे दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर दिसले.

अन्याय होणार नाही, याची काळजी घेऊआपण इतिहासाची पाने उघडायची थांबवली, तर पलूस तालुक्याचा विकास होईल. आजचा दिवस सुवर्ण अक्षरात लिहिला जाईल. यापुढे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही, याची काळजी घेऊ, अशी ग्वाही विश्वजीत कदम यांनी सभेत दिली.

मी सुपरवायझरदोन्ही नेत्यांचे आता मनोमिलन झाले आहे. यापुढे समस्या निर्माण होणार नाहीत. काही झाले, तरी मी सुपरवायझर बनून सर्वांची समजूत घालेन, असे जयंत पाटील यांनी सांगताच हशा पिकला.

लाड कुटुंब आत एक अन् बाहेर एक, असे राजकारण करीत नाही. जयंत पाटील जे आदेश देतील त्याप्रमाणे काम करू. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष व काँग्रेस एकत्र आल्यावर काय इतिहास घडतो, हे दाखवून देऊ. गाफील न राहता काम करायला हवे. आमचे कार्यकर्ते सर्व विसरून प्रामाणिक काम करतील. - शरद लाड, युवा नेते, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४palus-kadegaon-acपलूस कडेगावcongressकाँग्रेसVishwajeet Kadamविश्वजीत कदमNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारMahavikas Aghadiमहाविकास आघाडीwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024