शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीरमध्ये हिंदूंचे टार्गेट किलिंग; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
2
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
3
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
4
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
5
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
6
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
7
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
8
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
9
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
10
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
11
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
12
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
13
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
14
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
15
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
16
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
17
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
18
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
19
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
20
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?

मानसिंगराव १६, सत्यजित १०, सम्राटची ६ कोटी मालमत्ता; शिराळा मतदारसंघातील उमेदवारांची सांपत्तिक स्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2024 16:33 IST

शिराळा : शिराळा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार मानसिंग फत्तेसिंगराव नाईक यांची स्थावर व जंगम मालमत्ता १५ कोटी ९१ लाख ...

शिराळा : शिराळा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार मानसिंग फत्तेसिंगराव नाईक यांची स्थावर व जंगम मालमत्ता १५ कोटी ९१ लाख रुपयांची आहे. यामध्ये जंगम मालमत्ता ५ कोटी ६ लाख ३२ हजार १९६ रुपये, तर स्थावर मालमत्ता १० कोटी ८५ लाख ६० हजार रुपयांची आहे.त्यांनी १ कोटी २ लाख ८ हजार ६५२ रुपयांचे कर्ज घेतले आहे. त्यांच्याकडे ४०० ग्रॅम वजनाचे सोन्या-चांदीचे दागिने आहेत. पत्नी सुनीतादेवी यांच्या नावे १४ कोटी १० लाखांची स्थावर व जंगम मालमत्ता आहे. ८० ग्रॅम सोने व चारचाकी आहे. त्यांच्या नावे ५३ लाख ५४ हजार रुपयांचे कर्ज आहे. २०१९ मध्ये १० कोटी २७ लाख रुपयांची स्थावर व जंगम मालमत्ता होती.भाजप महायुतीचे उमेदवार सत्यजित शिवाजीराव देशमुख यांची स्थावर व जंगम मालमत्ता ९ कोटी ७२ लाखांची आहे. यामध्ये जंगम मालमत्ता १ कोटी ६५ लाख ३४ हजार ९८८ रुपयांची, तर स्थावर मालमत्ता ८ कोटी ६ लाख २० हजार रुपयांची आहे. त्यांच्या नावे १ कोटी ११ लाख ८ हजार ९८१ रुपये कर्ज आहे.त्यांच्याकडे ११०० ग्रॅम वजनाचे सोने व चांदीचे दागिने आहेत. पत्नी रेणुकादेवी व मुलगी साईतेजस्वी यांच्या नावे स्थावर व जंगम मालमत्ता, घर, गाडी, सोने आदी २ कोटी ६८ लाख १ हजार ६०२ रुपयांची मालमत्ता आहे. यामध्ये ७५० ग्रॅम सोने, एक किलो चांदीचा समावेश आहे. त्यांच्या नावे १ कोटी ३४ लाख ६ हजार ५८९ रुपयांचे कर्ज आहे. २०१९ मध्ये ४ कोटी ५० लाखांची स्थावर व जंगम मालमत्ता होती.

महाडिक यांची मालमत्ता सहा कोटींचीअपक्ष उमेदवार सम्राट नानासाहेब महाडिक यांची जंगम मालमत्ता ५ कोटी ९७ लाखांची आहे. त्यांच्या नावे ११ एकर ३२ गुंठे शेतजमीन आहे. ७५ ग्रॅम सोने आहे. पत्नी तेजस्वी, मुले समरप्रताप, तेजप्रताप यांची स्थावर व जंगम मालमत्ता, जमीन, घर, गाडी, सोने आदींची माहितीही त्यांनी प्रतिज्ञापत्राद्वारे दिली आहे.जंगम मालमत्ता २ कोटी ३९ लाख ४४ हजार १८ रुपयांची आहे. ८४७ ग्रॅम सोने व एक किलो चांदी आहे. २०१९ मध्ये २ कोटी ४३ लाखांची स्थावर व जंगम मालमत्ता होती.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४shirala-acशिराळाMansingrao Naikमानसिंगराव नाईकSatyajit Deshmukhसत्यजित देशमुखNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारBJPभाजपाwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024