शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

"इथं कशी अपेक्षा करता?" विरोधी पक्षनेतेपदाबाबत बोलताना अजित पवारांचे मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2024 12:50 IST

सांगतील बोलताना अजित पवार यांनी विरोध पक्षापदाबाबत महत्त्वाचे विधान केलं आहे.

Maharashtra Assembly Election Result 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार याच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठं यश मिळालं आहे. लोकसभ निवडणुकीत केवळ एक जागा मिळाल्यानंतर आता विधानसभेला अजित पवार यांचे ४१ आमदार निवडून आले आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडीचा निवडणुकीत दारुण पराभव झाला आहे. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांना मिळून ५० आमदारांचाही आकडा गाठता आला नाही. त्यामुळे ६० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच विधानसभेत विरोधीपक्ष असणार की नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे. अशातच अजित पवार यांनी विरोध पक्षापदाबाबत महत्त्वाचे विधान केलं आहे.

विधानसभेतील विजयानंतर  कराडमधील प्रितिसंगम येथे असलेल्या माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळाला आज उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भेट दिली. यावेळेस माध्यमांनी त्यांना विरोधी पक्ष नेतेपदासंदर्भात प्रश्न विचारला. यावर अजित पवार यांनी त्यांच्या शैलीत उत्तर दिलं. यावेळी अजित पवार यांनी रोहित पवार यांचीही भेट घेतली आणि त्यांना मिश्किल टोला लगावला. तसेच राज्यात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यताही अजित पवारांनी फेटाळून लावली.

"निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी आमदारांची यादी राज्यपालांना दिली आहे. आता तर आम्हाला बहुमत आहे. विरोधी पक्षनेता करता येणार नाही एवढ्या जागाही त्यांना मिळालेल्या नाहीत. तरीही आम्ही, मी, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आम्ही विरोधकांचा मान-सन्मान ठेवण्याची पद्धत सुरु ठेऊ. विरोधी पक्षाच्या नेत्यांना आपण सन्मान देतो. ते लोकांचे  प्रश्न मांडतील आम्ही ते सोडवण्याचा प्रयत्न करु. तसेच अधिकारी, आयपीएस अधिकाऱ्यांना विश्वासात घेऊ. पाच वर्षात मजबुतीने चालणारं हे सरकार आहे. केंद्र सरकार साडेचार वर्ष चालणार.  राज्य कसं सर्व क्षेत्रात आघाडीवर राहील याचा प्रयत्न करुन राज्य एक नंबरवर ठेऊ," असं अजित पवार यांनी म्हटलं.

यावेळी पत्रकरांनी अजित पवार यांना जरा मोठं मन दाखवून तुम्ही विरोधी पक्षनेता पद देणार का? असा प्रश्न विचारला. त्यावर अजित पवारांनी वर आभाळाकडे पाहत, "आमचं मोठं मन आता पार फुटायला लागलंय," असं म्हटलं. तसेच तुम्ही अगदी सोयीचं विचारता, केंद्रामध्ये ५४ च्या वर आकडा गेल्याशिवाय विरोधी पक्षनेता पद मिळतं का? मग इथं कशी अपेक्षा करता?" असंही अजित पवार म्हणाले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024Ajit Pawarअजित पवारSangliसांगलीNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवार