शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
2
तुमचे अधिकारी वृत्तपत्र वाचत नाहीत का? देशाची प्रतिमा मलिन होतेय; भटक्या कुत्र्यांवरून भडकले कोर्ट
3
१२ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; SIR दुसरा टप्पा ४ नोव्हेंबरपासून, महाराष्ट्राचा समावेश नाही
4
सरन्यायाधीश बूटफेक प्रकरण: वकिलावर कारवाई करणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण
5
तातडीने सुनावणीस नकार, पण दोन मागण्या मान्य; मराठा-ओबीसी आरक्षण वादात ओबीसी संघटनेला कोर्टाचा दिलासा
6
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
7
शिवडीतील दागिने लुटीचा सुरक्षारक्षक निघाला सूत्रधार; एकाच घरात राहत होते सर्व आरोपी
8
राम जन्मभूमी मंदिराचे काम पूर्ण, २५ नोव्हेंबरला भव्य सोहळा, ६ ते ८ हजार निमंत्रित येणार
9
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
10
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
11
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
12
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
13
विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी काय केले? तपशील सादर करण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश
14
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
15
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
16
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
17
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
18
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
19
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
20
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा

क्रिप्टो करन्सीतून चौपट परताव्याचे आमिष; सांगलीतील दोघींना १२ लाखांचा गंडा, पाचजणांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2023 16:01 IST

संशयितांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने फसवणूक झाल्याचे आले लक्षात

सांगली : क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातून गुंतविलेल्या रकमेच्या चौपट परतावा देण्याच्या आमिषाने दोन महिलांना सुमारे बारा लाखाचा गंडा घालण्यात आला. याप्रकरणी जयश्री जालिंदर बदडे (रा. शिव पॅराडाईज अपार्टमेंट, शंभरफुटी रस्ता, सांगली) यांनी पाचजणांविरोधात फिर्याद दिली आहे.गुन्हा दाखल झालेल्यामध्ये निर्मला सूर्यकांत सांगावकर (रा. लक्ष्मीनारायण अपार्टमेंट, गणेशनगर, सांगली), प्रशांत तुकाराम पठाणे (रा. गणेशनगर, सांगली), विशाल भीमराव कोरेगावकर (रा. तळसंदे, ता. हातकणंगले), व्यंकट मुळके (पूर्ण नाव माहीत नाही), विक्रम व्यंकट मुळके (रा. लातूर) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संशयित आणि फिर्यादी जयश्री बदडे एकमेकांच्या ओळखीच्या आहेत.बदडे यांना ‘पीएलसीयू अल्टीमा’ या क्रिप्टो करन्सीच्या आभासी चलनात गुंतवणूक केल्यास एक वर्षात चौपट परतावा मिळू शकतो, असे सांगण्यात आले. फिर्यादी बदडे यांचा त्यावर विश्वास ठेवत मुलगा अजिंक्य आणि पुतण्या सार्थक यांच्या मोबाईल ॲपवरून बँक खात्यावर चार लाख ७२ हजार ४०० रुपये जमा केले, तसेच रोख दोन लाख रुपये दिले. त्याचप्रमाणे शहरातील धनश्री कल्लाप्पा खोत यांनी पाच लाख रुपये जादा परताव्याच्या आमिषाने संशयितांना दिले होते.मे २०२२ ते जुलै २०२२ या कालावधीत क्रिप्टो करन्सीत गुंतवणूक केली होती. जून २०२३ पर्यंत काहीच परतावा न मिळाल्याने त्यांनी पैसे परत मिळविण्यासाठी पाठपुरावा केला. परंतु, संशयितांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आल्यावर बदडे यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली

टॅग्स :SangliसांगलीCryptocurrencyक्रिप्टोकरन्सीfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारी