शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीच्या आखाड्यात चंद्रहार पाटलांकडून विशाल पाटील चीतपट; ठाकरेंच्या पैलवानाची भाजपाच्या मल्लाशी लढत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2024 11:27 IST

Chandrahar Patil : सांगली लोकसभेच्या जागेवरुन काँग्रेस आणि ठाकरे गटाकडून दावा सांगण्यात आला होता. काँग्रेसकडून विशाल पाटील यांनी उमेदवारीची मागणी केली होती, तर ठाकरे गटाकडून पैलवान चंद्रहार पाटील यांनी उमेदवारीची मागणी केली होती.

Chandrahar Patil Sanjaykaka Patil ( Marathi News )  : गेल्या काही दिवसापासून महाविकास आघाडीमध्ये सांगली लोकसभेच्या जागेवरुन काँग्रेस आणि ठाकरे गटात तिढा सुरू होता. आज  ठाकरे गटाने लोकसभेसाठी पहिल्या १६ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. सांगली लोकसभेसाठी ठाकरे गटाने पैलवान चंद्रहार पाटील यांनी उमेदवारी जाहीर केली आहे. यामुळे आता भाजपाच्या संजयकाका पाटील यांच्या विरुद्ध ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील यांच्यात लढत होणार आहे.

नाशिकमध्ये उद्धव ठाकरेंचं धक्कातंत्र; विजय करंजकरांचा पत्ता कट, उमेदवारी मिळालेले राजाभाऊ वाजे कोण आहेत?

सांगली लोकसभेच्या जागेवरुन काँग्रेस आणि ठाकरे गटाकडून दावा सांगण्यात आला होता. काँग्रेसकडून विशाल पाटील यांनी उमेदवारीची मागणी केली होती, तर ठाकरे गटाकडून पैलवान चंद्रहार पाटील यांनी उमेदवारीची मागणी केली होती. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगलीतील सभेत चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारी जाहीर केली होती.

संजयकाका पाटलांनी चंद्रहार पाटलांना दिलं आव्हान

"भाजपच्या पहिल्या यादीत माझं नाव आलं, जिल्ह्यात १० वर्ष काम करत असताना अनेक मोठी काम करता आली. येणाऱ्या निवडणुकीत मोठ्या मताधिक्क्याने निवडून येऊ, विरोधकांच्या उमेदवारांच्यात अजूनही तु 'तु मै मै' सुरू आहे. माझी भूमिका अशी की, दोघांनी एकमेकांना आजमावं आणि या निवडणुकीत यावं, लोक निश्चितपणाने 'दूध का दूध, पाणी का पाणी' करतील, असं आव्हान संजयकाका पाटील यांनी चंद्रहार पाटील यांना दिलं आहे. 

सांगली लोकसभा मतदार संघ २०१४ पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. २०१४ च्या मोदी लाटेत या मतदारसंघात खासदार संजयकाका पाटील यांनी काँग्रेसच्या प्रतिक पाटील यांचा पराभव केला. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत संजयकाका पाटील यांच्याविरोधात विशाल पाटील यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून निवडणूक लढवली, तर वंचित बहुजन आघाडीतून गोपीचंद पडळकर होते या निवडणुकीतही संजयकाका पाटील यांनी विजय मिळवला.  

टॅग्स :chandrahar patilचंद्रहार पाटीलBJPभाजपाcongressकाँग्रेसlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४vishal patilविशाल पाटील