शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

साध्वींबद्दल भाजपाचे मौन का? - प्रकाश आंबेडकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2019 16:45 IST

साध्वी ठाकूर यांना उमेदवारी देऊन भाजपाने देशातील शहिदांचा अवमान करतानाच, लोकशाहीबद्दल घृणा निर्माण करण्याचे कृत्य केले आहे, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगली येथे केली आहे. 

ठळक मुद्देसाध्वी ठाकूर यांना उमेदवारी देऊन भाजपाने देशातील शहिदांचा अवमान करतानाच, लोकशाहीबद्दल घृणा निर्माण करण्याचे कृत्य केले आहे, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांच्या प्रचारार्थ सांगलीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर सभा पार पडली.साध्वीच्या प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा एक शब्दसुद्धा बोलत नाहीत. त्यामुळे त्यांचे छुपे मनसुबे स्पष्टपणे दिसत आहेत.  

सांगली - साध्वी ठाकूर यांना उमेदवारी देऊन भाजपाने देशातील शहिदांचा अवमान करतानाच, लोकशाहीबद्दल घृणा निर्माण करण्याचे कृत्य केले आहे, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगली येथे केली आहे. 

वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांच्या प्रचारार्थ सांगलीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर सभा पार पडली. यावेळी ते म्हणाले की, संपूर्ण देशात लोकशाही धोक्यात येत आहे. एकीकडे मोदी दहशतवाद संपविल्याचे सांगत असतानाच भाजपाकडून दहशतवादाचा आरोप असलेल्या साध्वीसारख्या लोकांना उमेदवारी दिली जाते. ज्या शहीद पोलिसांना अशोकचक्र दिले जाते त्यांच्याबद्दल अपशब्द काढून तमाम देशवासीयांचा अपमान साध्वी ठाकूर आणि भाजपाने केला आहे. साध्वीच्या प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा एक शब्दसुद्धा बोलत नाहीत. त्यामुळे त्यांचे छुपे मनसुबे स्पष्टपणे दिसत आहेत. पाकिस्तानचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना समर्थन देतो, यामागे नेमक्या काय गोष्टी दडल्या आहेत, हे आम्ही सत्तेवर आल्यानंतर उजेडात आणू. भारताचा पंतप्रधान कोण हे सांगणारा इम्रान खान कोण? यापुढे या देशात नरेंद्र मोदी कधीच पंतप्रधान होऊ शकणार नाहीत, याची दक्षता आम्ही घेतली आहे. एअर स्ट्राईक झाला हे आम्ही मान्य करतो, पण त्याबद्दलची चुकीची आणि परस्परविरोधी माहिती भाजपा नेते पसरवित आहेत. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी एकही माणूस मारला गेला नाही, असे सांगून खरे बोलल्या. त्यामुळे आम्ही त्यांचे जाहीर आभार मानत आहेत.  

गोपीचंद पडळकर म्हणाले की, प्रस्थापितांना विस्थापित करणारी ही निवडणूक आहे. या आघाडीतून मी पुन्हा भाजपामध्ये जाणार, अशी अफवा पसरविली जात आहे. पण त्यामध्ये कोणतेही तथ्य नाही. यापुढे भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादीसह अन्य पक्षाचे लोक आगामी विधानसभेच्या उमेदवारीसाठी वंचित बहुजन आघाडीकडे येतील. यावेळी माजी आमदार प्रकाश शेंडगे, जयसिंग शेंडगे, प्रा. सुकुमार कांबळे, यशपाल भिंगे, शकील पिरजादे, प्रशांत शेजाळ, ब्रम्हानंद पडळकर, नामदेव करगणे, सचिन माळी आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकSangliसांगलीBJPभाजपाPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरNarendra Modiनरेंद्र मोदी