वकील मारहाण प्रकरणाची सखोल चौकशी करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:18 IST2021-06-29T04:18:43+5:302021-06-29T04:18:43+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : कुपवाड येथे ॲड. प्रदीप जगताप यांना पोलिसाकडून झालेल्या मारहाण प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे. ...

वकील मारहाण प्रकरणाची सखोल चौकशी करणार
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कुपवाड येथे ॲड. प्रदीप जगताप यांना पोलिसाकडून झालेल्या मारहाण प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे. या चौकशीत जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी वकील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले.
ॲड. जगताप यांना पोलिसाकडून मारहाण करण्यात आली होती. संचारबंदीत बाहेर फिरत असल्याचे कारण देत असे करण्यात आले होते. त्यांनी दंड भरण्याची तयारी दर्शवली असतानाही त्यांना मारहाणीचा प्रकार घडला होता.
त्यानंतर वकील संघटनेच्यावतीने पोलीस अधीक्षक गेडाम यांची भेट घेत निवेदन सादर करण्यात आले होते. आठवड्यानंतरही यावर कार्यवाही न झाल्याने पुन्हा एकदा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अधीक्षकांची भेट घेत चर्चा केली. त्यात या प्रकरणाची चौकशी करत दोषी असणाऱ्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन गेडाम यांनी दिले.
यावेळी वकील संघटनेचे अध्यक्ष संदीप लवटे, सेक्रेटरी राजाराम यमगर, सहायक सेक्रेटरी शैलेश पाटील, विक्रांत वडेर, दत्ता वठारे, शिवाजी कांबळे, सागर पवार, रोहित कदम, शीतल मदवाने, कासीम मुलाणी, प्रदीप जगताप आदी उपस्थित होते.