शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

...अखेर सेविकेने सोडली सदनिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2015 21:45 IST

जिल्हा परिषद सभेत वादाचा मुद्दा : घरभाडे वसुलीची नागरिकांतून मागणी--लोकमतचा दणका

प्रमोद रावळ -आळसंद  -खानापूर तालुक्यातील वेजेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात असलेल्या वासुंबे उपकेंद्रातील अनिता बाबूराव दौंड या आरोग्य सेविकेने अखेर विटा प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांची अनधिकृत वापरात असलेली सदनिका सोडली. या आरोग्य सेविकेच्या सदनिकेचा विषय जिल्हा परिषदेच्या सभेत गाजला होता. त्यामुळे अखेर या आरोग्य सेविकेला विट्यातील सदनिका सोडावी लागली असली, तरी या आरोग्य सेविकाचा मुक्काम मुख्यालयात नसून, विट्यातच भाडोत्री घरात असल्याची चर्चा सुरू आहे.वेजेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील वासुंबे उपकेंद्रात नेमणूक असलेली अनिता दौंड ही आरोग्य सेविका वासुंबे येथे न राहता विट्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सदनिकेत अनधिकृत व नियमबाह्य वास्तव्यास होती. त्यामुळे ही सदनिका सोडण्यासाठी वरिष्ठ पातळीपासून प्रयत्न करण्यात आले. परंतु, दौंड यांनी एका महिला मंत्र्यांच्या नावाचा वापर करून वरिष्ठांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांचाही त्रास वाढला गेला. त्यामुळे या आरोग्य सेविकेला वासुंबे येथे स्थायिक करण्यासाठी व विट्यातील सदनिका सोडण्यासाठी केलेले प्रयत्न असफल झाले. परिणामी, आरोग्य कर्मचाऱ्यांतही प्रचंड नाराजी पसरली. हा वाद जिल्हा परिषदेच्या सभेत गेला. जि. प. सदस्य सुरेश मोहिते व फिरोज शेख, डॉ. नामदेव माळी या सदस्यांनी हा विषय चांगलाच ताणून धरल्याने जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना निर्णय घ्यावा लागला. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संतोष जोशी यांनी दौंड यांना नोटीस बजावून तातडीने सदनिका सोडण्याचा आदेश दिला. दरम्यान, जिल्हा परिषद सदस्य सुरेश मोहिते, फिरोज शेख यांनी मुख्यालय सोडून नियमबाह्य सरकारी निवासस्थानाचा वापर करणाऱ्या दौंड या आरोग्य सेविकेकडून घरभाडे वसूल करावे, अशी मागणी जि. प. सभेत केली होती. याची दखल घेवून प्रशासनाने कारवाई केली.‘लोकमत’चे अभिनंदनया प्रकाराचा ‘लोकमत’ने भांडाफोड केला होता. दि. १३ आॅगस्टला ‘वासुंबे उपकेंद्रातील आरोग्य सेविकेची विट्यात दबंगगिरी’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिध्द होताच हा विषय जिल्हा परिषदेच्या सभेत चांगलाच गाजला. त्यामुळे अखेर दौंड या आरोग्य सेविकेने विट्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सदनिकेतील आपला नियमबाह्य मुक्काम हलविल्याने ‘लोकमत’चे अभिनंदन होत आहे.