शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

भूमीमध्ये पैशासाठी ठेवीदारांचे हेलपाटे, सांगलीतील कार्यालय सुरूच, पुणे, विजापूरची शाखा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 12:03 IST

सांगली येथील कर्मवीर चौकातील भूमी प्रॉपकॉन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत गुंतवणूक केलेली रक्कम परत मिळविण्यासाठी ठेवीदारांचे हेलपाटे सुरु आहेत. कंपनीच्या पुणे व विजापूर येथील शाखा बंद केल्या आहेत. गुन्हा दाखल होऊन चार दिवस होऊन गेले तरी कंपनीचा व्यवस्थापकीय संचालक मनोज कदम व अन्य संचालकांचा शोध घेण्यात विश्रामबाग पोलिसांना यश आलेले नाही.

ठळक मुद्देसांगलीतील भूमी प्रॉपकॉन प्रायव्हेट लिमिटेड कार्यालय सुरूचपैशाच्या व्याजातून पाटण (जि. सातारा) येथे प्लॉट घेऊन देण्याचे आमिष मनोज कदमसह संचालक पसारविश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

सांगली : येथील कर्मवीर चौकातील भूमी प्रॉपकॉन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत गुंतवणूक केलेली रक्कम परत मिळविण्यासाठी ठेवीदारांचे हेलपाटे सुरु आहेत. कंपनीच्या पुणे व विजापूर येथील शाखा बंद केल्या आहेत.

गुन्हा दाखल होऊन चार दिवस होऊन गेले तरी कंपनीचा व्यवस्थापकीय संचालक मनोज कदम व अन्य संचालकांचा शोध घेण्यात विश्रामबाग पोलिसांना यश आलेले नाही. कंपनीचे कार्यालय सुरु असले तरी, ठेवीदारांना एक रुपयाही दिला जात नाही. 

ठेवीची रक्कम गुंतविल्यास त्याच्या व्याजातून प्लॉट घेऊन देणार, महिना बचत ठेव अशा योजना काढून कंपनीने लोकांना पैसे भरण्यास भाग पाडले. यासाठी एजंटांची नियुक्ती केली. इनाम धामणीच्या सुशिला पाटील यांनी स्वत:च्या तसेच सुनेच्या नावावर प्रत्येकी पाच लाख, अशी एकूण दहा लाखाची रक्कम २८ मे २०१४ रोजी गुंतविली होती.

तब्बल एक महिन्यानंतर कंपनीने त्यांना ठेवीच्या पावत्या दिल्या. एक वर्षाच्या मुदतीवर ठेव ठेवली होती. या पैशाच्या व्याजातून पाटण (जि. सातारा) येथे प्लॉट घेऊन देण्याचे आमिष कंपनीने दाखविले होते. मात्र प्रत्यक्षात त्यांना प्लॉट दिला नाही. तसेच मुदत संपूनही ठेवीची रक्कम दिली नाही. त्यामुळे पाटील यांनी चार दिवसांपूर्वी विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.पोलिसांनी मुख्य संशयित मनोज कदमच्या इनाम धामणी (ता. मिरज) येथील घरावर छापा टाकून झडती घेतली. पण तेथे काहीच सापडले नाही. गुन्हा दाखल झाल्याची चाहूल लागल्याने तो पसार झाला आहे. त्याच्याविरुद्ध नव्याने कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही.

सध्या कार्यालयात चार महिला काम करीत आहेत. यामध्ये एक महिला व्यवस्थापक म्हणून आहे. गुरुवारी दिवसभर ठेवीदार कार्यालयात भेट देऊन गुंतवणूक केलेली रक्कम परत देण्याची मागणी करीत होते.

महिला कर्मचाऱ्यांकडून त्यांना, व्यवस्थापक मॅडम नाहीत, त्या दुपारी तीननंतर येतात, असे उत्तर दिले जात होते. महिला व्यवस्थापक आल्यानंतर काही ठेवीदारांनी त्यांची भेट घेऊन पैसे देण्याची मागणी केली. यावर त्यांनी अर्ज करण्यास सांगितले. परंतु पैसे लगेच मिळणार नाहीत. व्यवस्थापकीय संचालक मनोज कदम यांच्याशी चर्चा करुन पैसे दिले जातील, असे त्यांनी उत्तर दिले.पोलिसांनी कंपनीच्या संचालकांचा शोध सुरु केला आहे. पण, त्यांचाही अजून सुगावा लागलेला नाही.मैत्रेयतील नोकरीनंतर भूमी काढली. संशयित मनोज कदम हा मैत्रेय या कंपनीत लिपिक म्हणून काम करीत होता. या कंपनीनेही सांगलीत गुंतवणूकदारांना कोट्यवधीचा गंडा घातला आहे.

याचा अजूनही पोलिस तपास सुरू आहे. मैत्रेयला टाळे लागल्यानंतर मनोज कदम याने स्वत:ची भूमी ही कंपनी काढली. पण त्याचीही कंपनी आर्थिक संकटात आली आहे. कंपनीचे महिन्याचे कलेक्शन कमी झाल्याने ठेवीदारांना पैसे देण्यास अडचणी निर्माण होत असल्याचे महिला कर्मचाऱ्यांनी सांगितले. पण मनोज कदम यांनी दुसरा व्यवसाय सुरू केला आहे, त्यामधून मिळणाऱ्या उत्पन्नातून पैसे दिले जातील, असेही त्या ठेवीदारांना सांगत आहेत.नऊ हजारासाठी दोन वर्षे टाळाटाळआरग (ता. मिरज) येथील एकाने प्रतिमहिना तीनशे रुपयांची गुंतवणूक केली आहे. २५ महिने त्याने पैसे भरले. कंपनीकडे साडेसात हजार रुपये जमा आहेत. व्याजासह कंपनी त्यांना नऊ हजार रुपये देणे लागते. दोन वर्षापूर्वी त्यांनी पैसे देण्याची मागणी केली.

कंपनीने पैसे भरल्याचे दिलेले प्रमाणपत्र जमा करुन घेतले; पण अजूनही पैसे दिले नाहीत. गुरुवारीही ते पैशासाठी कंपनीत आले होते; मात्र अजून दोन महिने लागतील, तसेच दोन टप्प्यात नऊ हजार रुपये दिले जातील, असे महिला कर्मचाऱ्यांनी त्यांना सांगितले.

 

टॅग्स :Sangliसांगलीcrimeगुन्हे