बिऊर येथील घरातून भरदुपारी ३ लाख रुपये किमतीचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 01:24 PM2021-04-07T13:24:07+5:302021-04-07T13:26:57+5:30

Crimenews Sangli- बिऊर (ता. शिराळा) येथील शेतकरी प्रकाश शिवाजी पाटील यांच्या घरातून अज्ञात चोरट्यानी भर दुपारी ६ तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्कम १५ हजार रुपये असा ३ लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.

Lampas worth Rs 3 lakh from a house in Beur | बिऊर येथील घरातून भरदुपारी ३ लाख रुपये किमतीचा ऐवज लंपास

बिऊर येथील घरातून भरदुपारी ३ लाख रुपये किमतीचा ऐवज लंपास

googlenewsNext
ठळक मुद्देबिऊर येथील घरातून ३ लाख रुपये किमतीचा ऐवज लंपास श्वान पथक, ठसे तज्ञ यांना पाचारण

शिराळा  :  बिऊर (ता. शिराळा) येथील शेतकरी प्रकाश शिवाजी पाटील यांच्या घरातून अज्ञात चोरट्यानी भर दुपारी ६ तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्कम १५ हजार रुपये असा ३ लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, प्रकाश पाटील हे आपल्या लहान मुलाला घेऊन पत्नीसह शिराळा येथे दवाखान्यात गेले होते. घरात कोणी नाही हे पाहून दुपारी १२ ते १ वाजण्याच्या दरम्यान चोरट्यांनी प्रकाश पाटील यांच्या घराचा मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. कपाटातील साडे तीन तोळ्याचे मंगळसूत्र , अंगठी , कर्णफुले , लहान मुलांचे दागिने असे ६ तोळे सोन्याचे दागिने , किरकोळ चांदीचे दागिने व रोख रक्कम १५ हजार असा जवळपास ३ लाख रुपये किमतीचा ऐवज लंपास केला.

या चोरीत मुख्य दरवाज्याचे कुलूप तोडून आत प्रवेश केला व  हा मुख्य दरवाजाला आतून कडी लावून  कपाटाचे दार उचकटून त्यातील डब्यात ठेवलेले दागिने व जवळच असलेले १५ हजार रुपये रोख रक्कम चोरून घराच्या मागील बाजूचा दरवाजाने पलायन केले. घटनास्थळी श्वान पथक, ठसे तज्ञ यांना पाचारण केले होते.हे श्वानपथक घराभोवतीच घुटमळले. ठसे तज्ज्ञांनी कपाटावरील ठसे घेतले आहेत.

घटनास्थळी माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांनी भेट दिली. यावेळी सरपंच सुखदेव पाटील, धनाजी पाटील, पोलिस पाटील, ग्रामसेवक व ग्रामस्थ उपस्थित होते. याबाबत प्रकाश पाटील यांनी पोलीस ठाण्यात वर्दी दिली असून हवालदार डी. जी. कुंभार हे तपास करीत आहेत.

पँटमध्ये ठेवलेली रोख रक्कम वाचली

 दि.२ एप्रिल रोजी मध्यवर्ती बँकेतून हे दागिने सोडवून आणले होते व दोन दिवस बँकांना सुट्टी असलेने कपाटात ठेवले होते. येथेच अडकवलेल्या पँट मध्ये रोख वीस हजार रुपये होते मात्र चोरट्याला ते मिळाले नाही त्यामुळे ही रक्कम वाचली.

ही दुसरी चोरी

शिराळा येथे दि.२६ मार्च रोजी सुधिर जाधव यांच्या घरातून २२ तोळे सोने व ५० हजार रुपये रोख असा ऐवज चोरीस गेला होता त्या चोरट्यांचा अद्याप शोध लागला नाही तोपर्यंत आज ही दुसरी चोरी झाली आहे.

 

Web Title: Lampas worth Rs 3 lakh from a house in Beur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.