शिराळ्यात एक लाखाची घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 15:35 IST2019-04-17T15:33:54+5:302019-04-17T15:35:21+5:30

येथील गोरक्षनाथ मंदिर रस्त्यावरील वर्धमान अरविंद बुद्रुक  (रा. शिराळा, मूळ गाव ऐतवडे बुद्रुक) यांच्या घराच्या दरवाजाची कडी कटावणीने उचकटून चोरट्यांनी तिजोरीतून तीन तोळे सोन्याचे दागिने व दहा हजार रुपये रोख रक्कम असा

A lacquer burglar in winter | शिराळ्यात एक लाखाची घरफोडी

शिराळ्यात एक लाखाची घरफोडी

ठळक मुद्देमंगळसूत्र असे सोन्याचे दागिने तसेच रोख दहा हजार रुपये असा 

शिराळा : येथील गोरक्षनाथ मंदिर रस्त्यावरील वर्धमान अरविंद बुद्रुक  (रा. शिराळा, मूळ गाव ऐतवडे बुद्रुक) यांच्या घराच्या दरवाजाची कडी कटावणीने उचकटून चोरट्यांनी तिजोरीतून तीन तोळे सोन्याचे दागिने व दहा हजार रुपये रोख रक्कम असा एक लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना सोमवार, दि. १५ रोजी रात्री ते मंगळवार, दि. १६ रोजी पहाटेच्यादरम्यान घडली.

दोन दिवसांपूर्वी कामानिमित्त घर बंद करून बुद्रुक कुटुंबीय ऐतवडे बुद्रुक येथे गेले होते. मंगळवारी सकाळी बुद्रुक यांच्या शेजाºयांना घराच्या दरवाजाची कडी उचकटल्याचे दिसले. त्यांनी वर्धमान बुद्रुक यांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर शिराळा पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास केला. यावेळी घरातील तिजोरीचा दरवाजा व लॉकर उघडून त्यातील दीड तोळ्याचा हार, बारशामध्ये भेट दिलेल्या अंगठ्या, मणी मंगळसूत्र असे सोन्याचे दागिने तसेच रोख दहा हजार रुपये असा     एक लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याचे निदर्शनास आले.

Web Title: A lacquer burglar in winter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.