शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
2
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
3
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
4
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
5
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
6
“नरेंद्र मोदी अन् अमित शाहांना महाराष्ट्राचे तुकडे करायचेत”; संजय राऊतांचा दावा
7
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
8
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
9
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
10
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
11
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
12
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
13
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
14
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
15
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
16
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
17
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
18
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
19
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
20
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?

घाटमाथ्यावर जनावरांची तडफड : चाऱ्याचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 10:12 PM

घाटनांद्रे : कवठेमहांकाळ तालुक्यातील घाटमाथ्यावरील कुची, जाखापूर, कुंडलापूर, गर्जेवाडी, वाघोली, तिसंगी व घाटनांद्रे परिसरात चालूवर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने चारा तयार न

ठळक मुद्देपशुखाद्याचे दरही भडकले; पशुधन जगविणे बनले जिकिरीचे

घाटनांद्रे : कवठेमहांकाळ तालुक्यातील घाटमाथ्यावरील कुची, जाखापूर, कुंडलापूर, गर्जेवाडी, वाघोली, तिसंगी व घाटनांद्रे परिसरात चालूवर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने चारा तयार न झाल्याने व सध्या ओढे, नाले, बंधारे, तलाव कोरडे ठणठणीत असल्याने जनावरांच्या चाºयाचा व पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यातच पशुखाद्याचे दरही गगनला भिडल्याने आपसुकच पशुपालन व दुग्ध व्यवसायावर गंभीर परिणाम झाल्याने बळिराजाचे संपूर्ण अर्थकारणच कोलमडले आहे.

दुष्काळाच्या या दाहकतेने तालुक्यातील घाटमाथ्यावरील १४ हजार पशुधन धोक्यात आले असून, चारा, पाणीटंचाई व पशुखाद्याचे भडकलेले दर यामुळे पशुधन जगविणे कठीण झाले आहे. अनेक पशुपालक शेतकरी जनावरांना बाजाराचा रस्ता दाखवू लागले आहेत. पशू खरेदी करणारे दलालही दर पाडून मागू लागले आहेत. घाटमाथ्यावरील शेतीबरोबरच पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर बनला आहे. सिंचन योजनेचे काम न झाल्याने शेतीच्या, जनावरांच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. सध्या घाटमाथ्यावरील घाटनांद्रे, तिसंगी, गर्जेवाडी, वाघोली, कुंडलापूर, जाखापूर व कुची या सात गावांमध्ये सुमारे साडेतेरा हजारापर्यंत पशुधन असून, तीव्र चारा व पाणीटंचाईत ते जतन करणे कसरतीचे बनले आहे.

सध्या कडब्याचे दर शेकडा १४०० ते १५०० पर्यंत असून त्यात गोळीपेंड, शेंगपेंड, सरकी पेंड, गहूआटा याचेही दर गगनाला भिडले आहेत. दुसरीकडे घाटमाथ्यावर चालूवर्षी पाऊस सरासरीपेक्षा कमी झाल्याने ओढे, नाले, बंधारे व तलाव कोरडे ठणठणीत असून, विहिरी व कूपनलिकांनी तळ गाठला आहे. दिवसाकाठी मोठ्या जनावरांना १०० लिटर, तर लहान जनावरांना किमान ५० लिटर पाणी लागते. ते उपलब्ध होण्यासाठी कोणतेही स्रोत शेतकºयांकडे उपलब्ध नाहीत. त्यामुळे जनावरे कशी जगवायची? हा प्रश्न शेतकºयांसमोर आहे.

पर्यायाने शेतीस पूरक अशा दुग्ध व्यवसायावर विपरित परिणाम झाला आहे. तीव्र उन्हामुळे जनावरांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. यावर मात करण्यासाठी तात्काळ टेंभू जलसिंचन योजनेचे काम सुरू करणे गरजेचे आहे. पण राजकीय नेते मात्र नेहमीसारखे आज-उद्याचा पुकारा करताना दिसत आहेत. शेतकरी राजा तीव्रतेने टेंभू योजनेची प्रतीक्षा करताना दिसत आहे.गाव गाई म्हैशी शेळ्या-मेंढ्यातिसंगी ४८७ ६३२ ५३१गर्जेवाडी १२७ १६४ १८४कुंडलापूर २१६ २६१ २५६घाटनांद्रे ४६७ ९९९ ८७१वाघोली १४५ २६३ १३४जाखापूर १९१६ २७३० १७३९कुची ४५२ ७५५ ५८३सरकी पेंड -७०० रूपये ( ५० कि.)गोळी पेंड - १२०० रूपये (६० कि.)गहू आटा-९०० रूपये (५० कि.)शेंग पेंड - १४०० ते १५००कडबा- १४०० ते १५००( शेकडा)हे सध्याचे दर असून, तेही स्थिर नसून त्यात वाढच होत आहे.

टॅग्स :SangliसांगलीMarketबाजार