शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
3
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
4
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
5
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
6
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
7
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
8
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
9
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
10
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
11
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
12
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
13
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
14
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
15
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
16
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
17
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
18
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
19
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
20
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!

लाखाच्या खंडणीसाठी मिरजेत परप्रांतीय मजुराचे अपहरण, तिघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2023 13:23 IST

अल्पवयीन संशयित फरार

मिरज : एक लाखाच्या खंडणीसाठी मिरजेत परप्रांतीय मजुराचे अपहरण करून चाकू व लोखंडी गजाने बेदम मारहाण करण्यात आली. अपहरण झालेल्या जीतबंधन पासवान (मूळ रा. उत्तर प्रदेश, सध्या रा. सलगरे, ता. मिरज) याची पोलिसांनी सुटका केली.याप्रकरणी पोलिसांनी संजू ऊर्फ खुदबुद्दीन शेखर कांबळे (वय २८, रा. प्रतापनगर झोपडपट्टी, मिरज), शहजाद सलीम शेख (वय २०, रा. कुपवाड) व साईनाथ गोविंद कांबळे (वय २२, रा. मिरज रेल्वेस्टेशनजवळ, मिरज) या तिघांना अटक केली असून, त्यांचा अल्पवयीन साथीदार फरारी आहे.

उत्तर प्रदेशातील जीतबंधन पासवान हा पाइपलाइनचे काम करणारा मजूर असून, तो सध्या सलगरे (ता. मिरज) येथे वास्तव्यास आहे. तो २५ डिसेंबर रोजी मिरज ग्रामीण बसस्थानकाजवळ सलगरे येथे जाण्यासाठी आला होता. त्यावेळी संजू कांबळे व त्याचे साथीदार त्याच्याजवळ आले. त्यांनी तुला सलगरेत सोडतो, असे सांगून जबरदस्तीने दुचाकीवर बसवून कुपवाड परिसरात निर्जनस्थळी नेऊन चाकू, लोखंडी गज व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.त्याच्याकडील दोन हजार रुपये व मोबाइल काढून घेतला. त्यानंतर जीतबंधन याचा मित्र अशोक पासवान यास फोन करून जीतबंधनला जिवंत सोडायचे असेल तर एक लाख रुपयांची खंडणी देण्याची मागणी केली. यामुळे घाबरलेल्या अशोक पासवान याने तातडीने गांधी चौक पोलिसांना माहिती दिली.पोलिस निरीक्षक सुधीर भालेराव यांच्या नेतृत्वाखाली पथक जीतबंधनच्या शोधासाठी रवाना झाले. खंडणीसाठी आलेल्या मोबाइल क्रमांकाचे लोकेशन तपासले असता, सर्वजण मिरजेत डॉ. आंबेडकर उद्यानाजवळ असल्याचे स्पष्ट आले. पोलिसांनी छापा टाकून जीतबंधनची सुटका केली. त्याला गंभीर जखमी अवस्थेत उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालय दाखल केले.अटकेतील सर्व सराईत गुन्हेगार असून, त्यांच्यावर यापूर्वी खुनाचा प्रयत्न, मारामारी, खंडणी आदी गंभीर गुन्हे दाखल आहेत. गुन्ह्यात सहभागी असणारा एक अल्पवयीन फरारी असून, त्याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

अपहरणकर्ते नशेच्या आहारीमजुराचे अपहरण करणारे सर्व आरोपी अमली पदार्थाचे व्यसनी आहेत. त्यांनी मोठा व्यावसायिक असल्याचे समजून पासवान याचे अपहरण केले. नशेत त्यास बेदम मारहाण केली. पोलिसांनी तातडीने शोध घेत सुटका केल्याने पासवान बचावला.

टॅग्स :Sangliसांगलीmiraj-acमिरजPoliceपोलिस