Sangli: सावळीत गॅसचा काळाबाजार, तिघांना अटक; कुपवाड पोलिसांची कारवाई 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2024 04:41 PM2024-05-21T16:41:47+5:302024-05-21T17:01:07+5:30

साडेपाच लाखांचे गॅस सिलिंडर, मशीन, मोटर, वजनकाटा जप्त

Kupwad police raided an illegal center that filled gas from domestic cylinders into commercial cylinders | Sangli: सावळीत गॅसचा काळाबाजार, तिघांना अटक; कुपवाड पोलिसांची कारवाई 

Sangli: सावळीत गॅसचा काळाबाजार, तिघांना अटक; कुपवाड पोलिसांची कारवाई 

कुपवाड : सावळी (ता. मिरज) येथील एन. डी. माऊली एच. पी. गॅस एजन्सी या ठिकाणी घरगुती सिलिंडरमधील गॅस व्यावसायिक सिलिंडरमध्ये भरणाऱ्या बेकायदेशीर केंद्रावर कुपवाड पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत ५ लाख ३१ हजार ८८० रुपयांचे भरलेले व रिकामे गॅस सिलिंडर, मशीन, मोटर, वजनकाटा असे साहित्य जप्त करण्यात आले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी तीन संशयितांना अटक केली असून, एका अल्पवयीनला ताब्यात घेतले आहे.

चंद्रकांत संभाजी कोळेकर (वय ३६, रा. सह्याद्रीनगर, दत्तमंदिर जवळ, सांगली), मनोजकुमार जबराराम बिश्नोई (२०, रा. एच. पी. गॅस गोडावूनशेजारी, गजवर्धन पार्क, ज्ञानगिरी वसाहत, सावळी मूळ गाव रा. गोगादेवगड ता. सेखला, जि. जोधपूर, राजस्थान), रेवनकुमार सुरेंद्र महाजन (२९, रा. प्लॉट नं. २, वसंत कॉलनी, सांगली) अशी अटक केलेल्या संशयिताची नावे आहेत, तर एका अल्पवयीनला ताब्यात घेतले आहे.

सावळी (ता. मिरज) येथील एन. डी. माऊली एच. पी. गॅस एजन्सी या ठिकाणी बेकायदेशीर घरगुती सिलिंडरमधील गॅस व्यावसायिक सिलिंडरमध्ये भरला जात आहे, अशी माहिती कुपवाड पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी मिरजेच्या तहसीलदारांना पत्र देऊन कारवाईसाठी पुरवठा निरीक्षकांची मागणी केली. पुरवठा निरीक्षक रघुनाथ कोळी यांच्या उपस्थितीत कुपवाड पोलिसांनी सोमवारी दुपारी छापा टाकला. यावेळी बेकायदेशीरपणे घरगुती वापराच्या १४ किलोंच्या सिलिंडरमधून व्यावसायिक वापराच्या १९ किलोंच्या सिलिंडरमध्ये एसटीपी मशीनच्या साहाय्याने गॅस भरत असल्याचे आढळले.

गोडावूनमधील ६७ हजार ४३० रुपयांचे १४ किलोंचे २१ भरलेले सिलिंडर आणि २४ मोकळे सिलिंडर, ५ अर्धवट भरलेले सिलिंडर त्यातील एका सिलिंडरला एसटीपी मशीनची पाईप लावलेली होती. तसेच २ लाख २९ हजार रुपयांचे १९ किलोंचे २० भरलेले सिलिंडर, १९ किलोंचे ६४ रिकामे सिलिंडर, १९ किलोंचे ३ अर्धवट भरलेले सिलिंडर. २ लाख १३ हजार ६५० रुपयांचे ४७ किलोंचे २ भरलेले सिलिंडर, ४७ किलोचे ७९ मोकळे सिलिंडर, एस.टी.पी. मशीन, विद्युत मोटार. हिटर, वजन काटा असा एकूण ५ लाख ३१ हजार ८८० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. उपनिरीक्षक विश्वजित गाडवे तपास करीत आहेत.

Web Title: Kupwad police raided an illegal center that filled gas from domestic cylinders into commercial cylinders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sangliसांगली