सांगलीत ओबीसी आरक्षणासाठी कृष्णेकाठी आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 16:00 IST2021-06-03T15:51:55+5:302021-06-03T16:00:02+5:30

OBC Reservation Bjp Sangli : ओबीसींचे राजकीय आरक्षण डावलल्याच्या निषेधार्थ ओबीसी लोकप्रतिनिधी कृष्णा नदीकाठी गुरुवारी आंदोलन केले. महाविकास आघाडी शासनाचा निषेध केला.

Krishnakathi agitation for OBC reservation in Sangli | सांगलीत ओबीसी आरक्षणासाठी कृष्णेकाठी आंदोलन

सांगलीत कृष्णा नदीकाठी ओबीसी कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे, पांडुरंग कोरे, बाबासाहेब आळतेकर, अमर प़डळकर आदींनी नेतृत्व केले.

ठळक मुद्देसांगलीत ओबीसी आरक्षणासाठी कृष्णेकाठी आंदोलनमहाविकास आघाडी शासनाचा निषेध

सांगली : ओबीसींचे राजकीय आरक्षण डावलल्याच्या निषेधार्थ ओबीसी लोकप्रतिनिधी कृष्णा नदीकाठी गुरुवारी आंदोलन केले. महाविकास आघाडी शासनाचा निषेध केला.

जिल्हाधिकारी व तहसीलदारांना निवेदन दिले. सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात आणले. त्यामुळे या प्रवर्गातून निवडणुक लढवण्यावर निर्बंध आले आहेत. एकप्रकारे ओबीसींची राजकीय हकालपट्टीच झाली आहे. याविरोधात ओबीसी कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.त्यामुळे कार्यकर्त्यांनी आंदोलनाचा मार्क पत्करला. सकाळी कृष्णा नदीकाठी निषेधाच्या फळकासह ते एकत्र आले.

शासनाविरोधात घोषणाबाजी केली. जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे म्हणाल्या की, ओबीसी समाजाचे हक्काचे आरक्षण मिळेपर्यंत शांत बसणार नाही. ओबीसींच्या राजकीय उच्चाटनाचे कारस्थाने महाविकास आघाडीने केले आहे, ते हाणून पाडू. आमदार सुधीर गाडगीळ म्हणाले, शासनाच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचे आरक्षण संपुष्टात आले. सर्वोच्च न्यायालयात योग्य बाजू न मांडल्याने ही स्थिती आली आहे.

माजी आमदार नितिन शिंदे, भाजपचे जिल्हाअध्यक्ष दीपक शिंदे-म्हैसाळकर, ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अमर पडळकर, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा वैशाली शेळके, स्थायी सभापती पांडुरंग कोरे, नगरसेवक गणेश माळी, गजानन मगदुम, प्रकाश ढंग, लक्ष्मण नवलाई, संगीता खोत, सविता मदने, उर्मिला बेलवलकर, कल्पना कोळेकर, अस्मिता सरगर, दीपक माने, सुब्राव मद्रासी, बाबासाहेब आळतेकर, ज्योती कांबळे, जयगौंड कोरे आदींनी आंदोलनात सहभाग घेतला.

सरकार कमी पडले

आमदार गाडगीळ म्हणाले की, सरकारने मराठा आरक्षणाचा खेळखंडोबा केला. आता ओबीसींनाही आरक्षणापासून वंचित ठेवले जात आहे. सर्वोच्च न्यायालयाने वारंवार विचारणा करुनही बाजू मांडली नाही.

Web Title: Krishnakathi agitation for OBC reservation in Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.