शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

कृष्णा नदी प्रदूषण: दत्त इंडिया, स्वप्नपूर्तीला कारखाना बंद करण्याचे आदेश, प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2023 18:52 IST

पाटबंधारेला पाण्याचा तर महावितरणला वीजपुरवठा बंद करण्याची सूचनाही दिली

सांगली : कृष्णा नदीच्याप्रदूषणप्रश्नी गंभीर दखल घेत, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने सोमवारी वसंतदादा साखर कारखाना चालविणाऱ्या दत्त इंडिया कंपनीसह डिस्टलरी चालविणाऱ्या स्वप्नपूर्ती शुगर्सला कारखाना बंद करण्याचे आदेश दिले. पाटबंधारेला पाण्याचा तर महावितरणला वीजपुरवठा बंद करण्याची सूचनाही त्यांनी दिली आहे.चार दिवसांपूर्वी कृष्णा नदीत अंकलीजवळ मासे मृत झाले. यावरून संतप्त झालेल्या सामाजिक संघटनांनी आंदोलने केली. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी पहिल्याच दिवशी प्रदूषणाचा स्रोत शोधून काढत दत्त इंडिया कंपनीला नोटीस बजावली होती. घटनास्थळाचा पंचनामा करून त्याबाबतचा एक अहवालही उपप्रादेशिक प्रदूषण नियंत्रण अधिकारी नवनाथ औताडे यांनी महाराष्ट्र प्रदूषण मंडळाला पाठविला होता. त्याची दखल घेत, दोन्ही कंपन्यांना सोमवारी नोटीस बजावण्यात आली.मंडळाने दोन्ही कंपन्यांना नदीच्या प्रदूषणास व मासे मृत होण्यास जबाबदार धरले आहे. नोटिशीत त्याबाबत स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना सध्या श्री दत्त इंडिया कंपनी चालवित आहे, तर कारखान्याची डिस्टलरी स्वप्नपूर्ती शुगर लिमिटेड ही कंपनी चालवित आहे. त्यामुळे दोन्ही कंपन्यांनी तातडीने कारखाने बंद करावेत, असे आदेश देण्यात आले आहेत.कंपन्यांना नोटिसा बजावतानाच मंडळाने महावितरण कंपनी व पाटबंधारे विभागाला वीज व पाणीपुरवठा तोडण्याची सूचना दिली आहे. तातडीने कार्यवाही करण्यात यावी, असे पत्रात म्हटले आहे. सोमवारी पत्रे प्राप्त झाल्याने मंगळवारी वीज व पाणीपुरवठा तोडला जाण्याची शक्यता आहे.

महापालिकेविरोधातही कारवाईच्या हालचालीमहापालिकेस यापूर्वीच फौजदारी कारवाईची नोटीस मंडळाच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी बजावली आहे. त्यावर महापालिकेने अद्याप खुलासा केलेला नाही. त्यामुळे येत्या दोन दिवसांत मंडळामार्फत महापालिकेवरही मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे.

‘दत्त इंडिया’कडून प्रतिसाद नाहीदत्त इंडिया कंपनीच्या उपाध्यक्षांना याप्रश्नी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे कंपनीची भूमिका समजू शकली नाही. शेवटच्या टप्प्यात कारखाना बंद झाल्यास कंपनीच्या, तसेच ऊस तोडणी करून गाळपाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

टॅग्स :SangliसांगलीSugar factoryसाखर कारखानेriverनदीpollutionप्रदूषण