शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

कोयना, वारणा धरण व्यवस्थापनाचे पाणी साठ्याकडे दुर्लक्ष, महापूर विरोधी कृती समितीची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 12:14 IST

पूर परिस्थिती निर्माण होण्याची भीती

सांगली : कोयना, राधानगरी, चांदोली या धरणामध्ये ७५ टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा झाला आहे. कृष्णा नदीकाठी पूर परिस्थिती निर्माण होण्याची भीती आहे. धरणातीलपाणीसाठ्याबाबत केंद्रीय जल आयोगाने नियमावली केली आहे. या नियमाचा एकाही धरण व्यवस्थापनाने अंमलबजावणी केली नाही. कोयना आणि वारणा धरण व्यवस्थापनाला केंद्रीय जल आयोगाच्या नियमानुसार जुलैपर्यंत ५० टक्केच पाणीसाठा ठेवण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी सूचना द्यावी, अशी मागणी महापूर विरोधी कृती समितीतर्फे जिल्हाधिकारी यांच्याकडे बुधवारी केली.महापूर विरोधी कृती समितीतर्फे दिलेल्या निवेदनात म्हटले की, सद्य:स्थितीत सर्वत्र पाऊस सुरू आहे. सांगली शहर, कृष्णाकाठचा सर्व परिसर हा कृष्णा नदीच्या पूरपात्रात येतो. महापुराचे गंभीर सावट यावर्षी जाणवत आहे. आतापर्यंत आलेल्या पुराचे कारण म्हणजे कोयना धरणातील पाणीसाठा हा क्षमतेपेक्षा जास्त ठेवल्याचे आहे. दि. १५ जुलै रोजी केंद्रीय जल आयोगाच्या नियमांचा कोयना धरण व्यवस्थापनाने भंग केलेला आहे. जुलै २०२५ पर्यंत केंद्रीय जल आयोगाच्या तत्त्वाने सर्व धरणांसाठी ५० टक्के इतकाच पाणीसाठा ठेवणे गरजेचे आहे.सध्या कोयना, राधानगरी, वारणा धरणामध्ये ७५ टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा ठेवला आहे. येत्या काही दिवसात पाऊस वाढल्यास कोयना धरणातून व्यवस्थापनास प्रति सेकंद एक लाख क्युसेकपर्यंत विसर्ग करावा लागेल. त्यामुळे सर्वत्र कृष्णा नदीकाठी पूर परिस्थिती निर्माण होईल. जिल्हाधिकारी यांनी पाटबंधारे विभागाला धरण पाणीपातळी तातडीने केंद्रीय जल आयोगाच्या नियमाप्रमाणे जुलैला ५० टक्केपर्यंतच पाणीसाठा ठेवणे गरजेचे आहे. त्यानुसार आतापासूनच धरणातून विसर्ग वाढवावा. यामुळे भविष्यात होणारी वित्त व जीवित हानी टाळणे शक्य आहे.यावेळी कृष्णा महापूर नियंत्रण समितीचे निमंत्रक सर्जेराव पाटील, महापूर विरोधी कृती समितीचे मनोज साळुंखे, रणजित जाधव, संतोष कोळेकर, राहुल चौगुले, संदीप खोत, रुस्तुम पटेल, सुभाष कोळेकर, रोहित चौगुले आदी उपस्थित होते.

केंद्रीय जल आयोगाकडेही तक्रार : सर्जेराव पाटीलपश्चिम महाराष्ट्रातील धरणामध्ये ७५ टक्केपेक्षा जास्त पाणीसाठा जुलैमध्येच ठेवला आहे. या पाणीसाठ्यामुळे भविष्यात सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांना पुराचा धोका निर्माण होऊ शकतो. म्हणून केंद्रीय जल आयोगाने तातडीने सर्वच धरण व्यवस्थापन विभागाला पाणीसाठा नियमानुसार ठेवण्याची सूचना द्यावी, अशा मागणीचे पत्र केंद्रीय जल आयोगाकडे पाठविले आहे, असेही कृष्णा महापूर नियंत्रण समितीचे निमंत्रक सर्जेराव पाटील यांनी सांगितले.