शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कोरेगाव-भीमा दंगल प्रकरण: 'शरद पवार, प्रकाश आंबेडकरांनी महाराष्ट्राची माफी मागावी'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2022 12:46 IST

सांगली : कोरेगाव-भीमा येथील दंगल प्रकरणात शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांचा सहभाग नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अकारण हिंदुत्ववादी ...

सांगली : कोरेगाव-भीमा येथील दंगल प्रकरणात शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांचा सहभाग नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अकारण हिंदुत्ववादी संघटनांवर आरोप केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार व वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आबंडेकर यांनी महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे संस्थापक नितीन चौगुले यांनी आज, गुरुवारी पत्रकार परिषदेत केली.चौगुले म्हणाले की, कोरेगाव भीमा येथील दंग्याप्रकरणी हिंदुत्ववादी संघटनांचा कोणताही संबंध नव्हता. तरीही आधारविना प्रकाश आंबेडकरशरद पवार यांनी हिंदुत्ववादी संघटनांच्या सहभागाचा आरोप केला. चौकशी आयोगासमोर ज्यावेळी लेखी म्हणणे मांडण्याची वेळ आली त्यावेळी या दोन्ही नेत्यांनी यासंर्भात काहीही माहिती नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे त्यांची ही दुटप्पी भूमिका समोर आली आहे. राज्यातील दलित समाजांमध्ये यामुळे गैरसमज निर्माण करण्यात आले. राज्यभर दंगली घडविण्याचे कारस्थान यामागे होते. यात राज्यातील काही संघटनांचा समावेश आहे.तर राज्यभर मोर्चशासनाने व पोलिसांनी आता या प्रकरणातील खऱ्या सुत्रधारांना शोधावे. जोपर्यंत त्यांना अटक होऊन कारवाई होत नाही, तोपर्यंत शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान लढत राहणार. सुरुवातीला निवेदने देण्यात येतील. त्यानंतरही कारवाई झाली नाही, तर राज्यभर मोर्च काढण्यात येतील, असा इशारा चौगुले यांनी दिला.'या' अधिकाऱ्यांना शांततेचे श्रेयते म्हणाले की, तत्कालिन विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील, पोलीसप्रमुख सुहैल शर्मा व अन्य अधिकाऱ्यांनी हिंदुत्ववादी संघटना तसेच दलित संघटनांची एकत्रित बैठक घेतल्यामुळे सांगलीत शांतता प्रस्थापित झाली. त्यामुळे या सर्व अधिकाऱ्यांनाही शांततेचे श्रेय जाते. घटनेनंतर लगेचच उदयनराजे यांनी आम्हाला पाठींबा दिला होता. सांगलीतील २८ दलित संघटनांनीही आम्हाला पाठींबा दर्शवून विश्वास व्यक्त केला होता.पुणे पोलिसांचे आभारचौगुले म्हणले की, पुणे पोलिसांनी प्रामाणिकपणे व निपक्षपातीपणाने तपास केल्याने सत्य बाहेर आले. त्यामुळे पुणे पोलिसांचे आम्ही आभारी आहोत. त्यांनी आता सुत्रधाराचा शोध घेऊन कारवाई करावी, ही अपेक्षा आहे.

टॅग्स :SangliसांगलीBhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचारCourtन्यायालयSambhaji Bhideसंभाजी भिडे गुरुजीSharad Pawarशरद पवारPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकर