शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट: श्रेयस अय्यर ड्रेसिंग रुममध्येच बेशुद्ध पडलेला; वैद्यकीय पथकाने लागलीच धोका ओळखला, नाहीतर...
2
"तेच रडणे, तीच मळमळ, त्याच उलट्या, त्याच फुशारक्या...", भाजपाने उद्धव ठाकरेंना डिवचलं
3
पेटीएम, जीपे, फोनपेवरील ऑटो पे कसे बंद कराल? आपोआप जातायत सबस्क्रीप्शन, पेमेंटचे पैसे... 
4
Aadhaar Card New Rules 1st Nov: महत्त्वाची बातमी! १ नोव्हेंबरपासून बदलणार आधार कार्डाशी निगडीत ३ मोठे नियम, जाणून घ्या
5
वनप्लस १५ येतोय...! पण १४ क्रमांक का वगळला? चिनी संस्कृतीत असे काय आहे...
6
Bank Holidays November 2025: नोव्हेंबरमध्ये किती दिवस बँका राहणार बंद? पाहा RBI ची हॉलिडे लिस्ट, पटापट आटपा काम
7
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
8
शंकर महाराज प्रकट दिन: म्हणा अकरा कवनांचे स्तोत्र, विजयी होईल सर्वत्र; कामना होतील पूर्ण
9
Tulasi Vivah 2025: विष्णू हे लक्ष्मीपती असूनही दरवर्षी तुळशीशी का लावला जातो विवाह?
10
LIC ची ‘ही’ स्कीम गुंतवणूकदारांना बनवेल कोट्यधीश!; ४ वर्षापर्यंत भरा प्रीमिअम, मिळतील १ कोटी
11
१०० वर्षांनी महालक्ष्मीसह ४ राजयोग: ७ राशींना सुबत्ता, कल्याण; बक्कळ लाभ, यशाचा मंगलमय काळ!
12
"मी तुला कच्च खाऊन टाकेन"; बायकोने नवऱ्याला गर्लफ्रेंडसोबत रंगेहाथ पकडलं, चपलेने धू-धू धुतलं
13
आजचे राशीभविष्य, २८ ऑक्टोबर २०२५: ‘मौनं सर्वार्थ साधनम्’, येणी वसूल होतील; सरकारी लाभ
14
तेव्हा गरजेपेक्षा जास्त कर्मचारी भरले, आता त्यांना बेरोजगार करणार; ॲमेझॉनमध्ये ३०,००० नोकऱ्या धोक्यात
15
चिनी हँडलर, टेलिग्राम ट्रॅप, लाखोंची लूट... ४७ लाखांच्या फसवणुकीचा पर्दाफाश, तिघांना अटक
16
तुमचे अधिकारी वृत्तपत्र वाचत नाहीत का? देशाची प्रतिमा मलिन होतेय; भटक्या कुत्र्यांवरून भडकले कोर्ट
17
Shani Gochar 2025: शनिचा फेरा आपल्या राशीसाठी नेहमीच तापदायक ठरतो का? पाहूया भावानुसार फळ
18
१२ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; SIR दुसरा टप्पा ४ नोव्हेंबरपासून, महाराष्ट्राचा समावेश नाही
19
मतदाराचे आणि त्याच्या वडिलाचे आडनाव वेगवेगळे, २० हजार मतदारांची नावे संशयास्पद: आदित्य ठाकरे
20
शाळेची नव्हे, धोक्याची घंटा! सरकारी अनास्था आणि 'विनाअनुदानित' इंग्रजी शाळांचा वाढता बाजार

कोल्हापूर-मुंबई मार्गावर २४ सप्टेंबरपासून जादा रेल्वे धावणार, कधी अन् किती वाजता सुटणार.. जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2025 17:41 IST

दादर - म्हैसूर २० मिनिटे अगोदर सुटणार

सांगली : कोल्हापूर-मुंबई-कोल्हापूर ही साप्ताहिक विशेष एक्सप्रेस रेल्वे २४ सप्टेंबर ते २६ नोव्हेंबर या कालावधीत धावणार आहे. या काळात तिच्या जाता-येता २० फेऱ्या होतील.गाडी क्रमांक ०१४१८ ही कोल्हापूर - मुंबई साप्ताहिक विशेष गाडी दर बुधवारी कोल्हापुरातून रात्री १० वाजता निघेल. सांगलीरेल्वे स्थानकात रात्री ११ वाजून ४० मिनिटांनी येईल. दुसऱ्या दिवशी दुपारी १:३० वाजता मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोहोचेल. गाडी क्रमांक ०१४१७ ही मुंबई (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) ते कोल्हापूर साप्ताहिक विशेष गाडी दर गुरुवारी दुपारी २:३० वाजता निघेल. सांगलीत रात्री १ वाजता पोहोचेल. कोल्हापुरात पहाटे ४:२० वाजता जाईल. या एक्सप्रेसला मिरज, सांगली, किर्लोस्करवाडी, कराड, सातारा, लोणंद, जेजुरी, पुणे, लोणावळा, कल्याण हे थांबे आहेत. या गाडीला एक वातानुकूलित द्वितीय श्रेणी, ३ तृतीय श्रेणी वातानुकूलित, १० स्लीपर, ४ सामान्य, २ सामान्य द्वितीय श्रेणी डबे असतील. नागरिक जागृती मंचचे अध्यक्ष सतीश साखळकर यांनी या गाडीसाठी पाठपुरावा केला होता.

दादर - म्हैसूर २० मिनिटे अगोदर सुटणारदादर - म्हैसूर- तिरूनेलवल्ली- पुद्दुचेरी ही गाडी मिरज जंक्शनमधून सकाळी ६:५० ऐवजी सकाळी ६:३० वाजता सुटेल. अजमेर - बंगळुरू, जोधपूर - बंगळुरू, गांधीधाम - बंगळुरू ही एक्सप्रेस मिरजमधून सकाळी ७:४५ ऐवजी सकाळी ७:२५ वाजता सुटेल. शनिवारपासून (दि. १३) हा बदल अमलात येणार आहे. रेल्वेच्या वेळापत्रकातील बदलाची प्रवाशांनी नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे कृती समितीचे मकरंद देशपांडे, सुकुमार पाटील यांनी केले आहे.