शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूरातून कोल्हापूर, मिरज एक्सप्रेस १ सप्टेंबरपासून धावण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 12:48 IST

Railway Sangli : सोलापूर-कोल्हापूर व सोलापूर- मिरज या प्रदीर्घ काळ बंद असलेल्या एक्सप्रेस १ सप्टेंबरपासून पुन्हा धावण्याची शक्यता आहे. लांब पल्ल्याच्या काही एक्सप्रेस पुन्हा सुरु करण्याच्या हालचाली सोलापूर विभागाकडून सुरु आहेत.

ठळक मुद्देसोलापूरातून कोल्हापूर, मिरज एक्सप्रेस १ सप्टेंबरपासून धावण्याची शक्यतापंढरपूर पॅसेंजर तूर्त नाहीच

सांगली : सोलापूर-कोल्हापूरसोलापूर- मिरज या प्रदीर्घ काळ बंद असलेल्या एक्सप्रेस १ सप्टेंबरपासून पुन्हा धावण्याची शक्यता आहे. लांब पल्ल्याच्या काही एक्सप्रेस पुन्हा सुरु करण्याच्या हालचाली सोलापूर विभागाकडून सुरु आहेत.सोलापूर विभागाच्या सोलापूर-कोल्हापूर व कोल्हापूर-सोलापूर या एक्सप्रेस दररोज रात्री ११ वाजता सोलापूर व कोल्हापुरातून सुटतात. तर सोलापूर -मिरज एक्सप्रेस सकाळी सात वाजता सोलापुरातून आणि संध्याकाळी साडेचार वाजता मिरजेतून सुटते. लॉकडाऊन काळात त्या थांबविण्यात आल्या होत्या. अनलॉक काळात काही आरक्षित प्रवासाच्या गाड्या पुन्हा सुरु करण्याच्या हालचाली सोलापूर विभागात सुरु आहेत.

या गाड्यांमध्ये जनरल श्रेणीचा प्रवास करता येणार नाही, फक्त आरक्षण केलेल्या प्रवाशांनाच प्रवेश मिळेल. सोलापूरचे विभागीय व्यवस्थापक शैलेश गुप्ता यांनी याला दुजोरा दिला. १ सप्टेंबरपासून काही आरक्षित गाड्या सुरु केल्या जाणार असल्याचे ते म्हणाले.

प्रवासी संघटनेचे अध्यक्ष संजय पाटील यांनी सांगितले की, यामुळे कोल्हापूर, सांगली व सोलापूर जिल्ह्यांतील हजारो प्रवाशांची सोय होणार आहे. कोरोनाविषयक खबरदारी घेऊन प्रवासाला मुभा मिळेल. दीड वर्षांपासून गाड्या बंद असल्याने प्रवाशांची कुचंबणा झाली आहे.पंढरपूर पॅसेंजर तूर्त नाहीचदरम्यान, मिरज ते पंढरपूर मार्गावरील पॅसेंजर गाड्या सुरु होण्याची चिन्हे मात्र नाहीत. संपूर्ण अनलॉकनंतरच टप्प्याटप्प्याने त्या सुरु होतील.

टॅग्स :railwayरेल्वेSangliसांगलीSolapurसोलापूरkolhapurकोल्हापूर