शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरच्या इंडियन स्पोर्टस् क्लबला ‘विश्वजित चषक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:24 IST

कवठेमहांकाळ : कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्या वाढदिवसानिमित्त विश्वजित कदम फाउंडेशनच्यावतीने येथे आयोजित क्रिकेट स्पर्धेत कोल्हापूर येथील इंडियन ...

कवठेमहांकाळ : कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्या वाढदिवसानिमित्त विश्वजित कदम फाउंडेशनच्यावतीने येथे आयोजित क्रिकेट स्पर्धेत कोल्हापूर येथील इंडियन स्पोर्टस् क्लबने विश्वजित चषक पटकावला.

येथील महांकाली सहकारी साखर कारखान्याच्या मैदानावर विश्वजित चषक क्रिकेट स्पर्धा झाल्या. युवा नेते जितेश कदम यांच्या हस्ते उद्घाटन झाले.

विजेत्यांना रोख पारितोषिक व चषक देण्यात आले.

प्रथम क्रमांक (५१ हजार रुपये बक्षीस) : इंडियन स्पोर्टस्‌ कोल्हापूर, द्वितीय क्रमांक (३१ हजार) : दिघंची स्पोर्ट्स, दिघंची, तृतीय क्रमांक (१५ हजार) : मुबारक स्पोर्ट्स, विजापूर, चतुर्थ क्रमांक (११ हजार) : करोली स्पोर्ट्स, करोली यांनी मिळविला. उद्योजक मयूर पाटील यांच्या हस्ते स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. या स्पर्धेचे ड्रोन कॅमेराद्वारे यु ट्युबद्वारे थेट प्रक्षेपण झाले. आंतरराष्ट्रीय दर्जाचे मैदान तयार करून या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. मुंबईच्या पंचांना आमंत्रित करण्यात आले होते. चिपळूणचे सुप्रसिद्ध समालोचक अमित यांनी समालोचन केले.

महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांतील ३२ क्रिकेट संघांनी सहभाग घेतला. विश्वजित युथ फौंडेशन कवठेमहांकाळचे अध्यक्ष उदयसिंह शिंदे यांनी संयोजन केले.