मालगावच्या तरुणाचा अपहरण करून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2018 11:22 PM2018-11-04T23:22:48+5:302018-11-04T23:22:53+5:30

मिरज : मालगाव येथील सार्जन शहाजी काळे (वय २५) या तरुणाचा काठ्यांनी बेदम मारहाण करून खून करण्यात आला. रविवारी ...

Killed the kidnapping of a youth in Malgaon | मालगावच्या तरुणाचा अपहरण करून खून

मालगावच्या तरुणाचा अपहरण करून खून

Next

मिरज : मालगाव येथील सार्जन शहाजी काळे (वय २५) या तरुणाचा काठ्यांनी बेदम मारहाण करून खून करण्यात आला. रविवारी सकाळी सिध्देवाडी येथे सार्जन याचा मृतदेह सापडला. बनावट सोने विक्री व फसवणूक प्रकरणातून सहा ते सातजणांनी मोटारीतून अपहरण करून सार्जन काळे याचा खून केल्याची तक्रार आहे. याप्रकरणी ग्रामीण पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मालगाव येथील पारधी वस्तीवर राहणाऱ्या सार्जन काळे याचे शनिवारी सायंकाळी मोटारीतून आलेल्या सहा ते सातजणांनी अपहरण केले. कुपवाड येथील दिनेश नामक व्यक्तीने सार्जन याचे वडील शहाजी व भाऊ अमरीश यांच्या मोबाईलवर संपर्क साधून बनावट सोने देऊन घेतलेले ५० हजार रुपये व दोन अंगठ्या परत करून सार्जन यास घेऊन जा, असे सांगितले. शहाजी काळे यांनी पारधी मुक्ती आंदोलनाचे सनातन भोसले यांना हा प्रकार सांगितला. भोसले यांनी अपहरणकर्त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधल्यानंतर सार्जन हा ताब्यातून पळाल्याचे सांगण्यात आले. शनिवारी रात्री ग्रामीण पोलिसांना ही माहिती देण्यात आली. पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली. रविवारी सकाळी सिध्देवाडी येथे हनुमान मंदिराजवळ सार्जन याचा मृतदेह आढळला. त्याच्या पाठीवर, छातीवर, पायावर काठ्यांनी मारहाणीचे वळ होते. मृतदेहाच्या उत्तरीय तपासणीत सार्जन याच्या बरगड्या मोडल्याचे व मारहाणीमुळे त्याचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. सार्जन याचा खून करणाºयांना अटक करण्याच्या मागणीसाठी काळे कुटुंबियांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. पोलिसांनी आरोपींविरुध्द गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिल्यानंतर दुपारी मृतदेह ताब्यात घेण्यात आला.
स्वस्त सोन्याचे आमिष
मालगाव व खंडेराजुरी परिसरात स्वस्तात सोने देण्याच्या आमिषाने कुपवाड येथील काहीजणांच्या फसवणुकीचा प्रकार घडला होता. या घटनेशी संबंध नसताना फसवणुकीची रक्कम वसूल करण्यासाठी सार्जन यास बेदम मारहाण करून त्याचा खून केल्याची तक्रार कुटुंबियांनी केली.

Web Title: Killed the kidnapping of a youth in Malgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.