शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: मुलीस त्रास देण्याच्या गैरसमजातून तरुणाचे अपहरण करून खुनाचा प्रयत्न, चौघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2023 12:41 IST

पोलिसांनी केवळ चार तासांत संशयितांना अटक केली

सांगली : शहरातील सांगलीवाडी येथे मुलीला त्रास देत असल्याच्या गैरसमजातून तरुणाचे अपहरण करून त्यास लोखंडी गज आणि काठीने बेदम मारहाण करून खुनाचा प्रयत्न करण्यात आला. सचिन शिवाजी खर्जे (वय १९) असे गंभीर जखमी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी मच्छिंद्र शिवाजी खर्जे (रा. गावडे मळा, सांगलीवाडी) यांनी फिर्याद दिली होती.पोलिसांनी तपास करत वैभव नंदकुमार साळसकर (वय ३०, रा. गवळी गल्ली, सांगली), युवराज सदाशिव जाधव (३७), आकाश सुभाष घबाडे (२२) आणि अथर्व ऊर्फ बबलू विजय वायदंडे (३७, तिघेही रा. जाधव प्लॉट, सांगलीवाडी) यांना जेरबंद केले आहे.शनिवारी दुपारी चारच्या सुमारास हा प्रकार घडला होता. जखमी सचिन खर्जे या एका संशयिताच्या मुलीस त्रास देत असल्याचा त्याला गैरसमज झाला होता. सचिन हा शहरातील शंभर फुटी रस्त्यावर असणाऱ्या एका प्लायवूड कंपनीत माल उतरविण्यासाठी आला होता. त्यावेळी संशयितांनी त्यास जबरदस्तीने दुचाकीवर बसवून सांगलीवाडी येथील बायपास रस्त्यावर आणत त्याला लोखंडी गज, काठीने मारहाण केली होती. यात सचिन गंभीर जखमी झाला होता.याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल होताच पथकाने केवळ चार तासांत यातील संशयितांना अटक केली. संशयितांनी जखमी सचिनचे अपहरण करून थेट त्याच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सांगली शहरचे पोलिस निरीक्षक अभिजित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक शिवानंद कुंभार, महादेव पोवार, संदीप पाटील, गुंडोपंत दोरकर, संतोष गळवे, गौतम कांबळे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस