शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: दादांनी आणायला सांगितलंय, गाडीत बस नाहीतर ठार मारु; अपह्रत पं.स. सदस्याने सांगितली आपबिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 18:03 IST

गोव्यातील कळंगुट बीचवर नेले : स्थानिक गुन्हे अन्वेषणकडे तपास

सांगली : ‘दादांनी आणायला सांगितलंय, गाडीत बस नाहीतर ठार मारु, अशी धमकी आपल्याला पिस्तूल रोखून दिल्याची तक्रार मिरज पंचायत समितीचे सदस्य पांडुरंग इंगळे यांनी पोलिसात मंगळवारी दिली. मिरज पंचायत समिती सभापती निवडीपूर्वी बुधगाव (ता. मिरज)चे सदस्य पांडुरंग इंगळे यांचे अपहरण करण्यात आले होते. सभापती निवडीनंतर त्यांना मंगळवारी सायंकाळी मिरजेत सोडून देण्यात आले. पिस्तुलाच्या धाकाने चौघांनी अपहरण करून गोव्यातील कळंगुट बीचवर नेल्याचा जबाब इंगळे यांनी दिला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत अपहरण प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषणकडे सोपवला आहे. त्यामुळे गुन्हे अन्वेषणच्या तपासाकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.पांडुरंग इंगळे यांचे अपहरण करण्यात आल्याची तक्रार त्यांचा मुलगा अमर इंगळे यांनी सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात दिली होती. त्यामुळे ग्रामीण पोलिस याचा तपास करत होते. मंगळवारी सभापती निवडीवेळी इंगळे गैरहजर राहिल्यामुळे नाट्यमय घडामोडी घडल्या. त्यामुळे राजकीय पातळीवर या अपहरण प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली आहे. मंगळवारी सभापती निवडी झाल्यानंतर रात्री अपहृत सदस्य पांडुरंग इंगळे यांना प्रथम मिरजेत आणून नंतर सांगलीत सोडल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर सांगली ग्रामीण पोलिसांनी त्यांना पोलिस ठाण्यात आणून जबाब नोंदवला.अपहृत सदस्य इंगळे यांनी जबाबात म्हंटले आहे, सभापती निवडीच्या आदल्या दिवशी दि. ९ रोजी बुधगाव-माधवनगर रस्त्यावरील शेतात गेलो होतो. सायंकाळी ५.३० वाजता एस्सार पेट्रोलपंपाजवळ मोटार घेऊन थांबलेल्या तिघांनी मला धरून मोटारीत जबरदस्तीने बसवले. त्यापैकी एकाने पिस्तूल रोखून खल्लास करण्याची धमकी दिली.मोबाईल काढून घेऊन बंद केला. तेथून मला नागज फाट्यावर नेले. वाटेत मोटारीतून नेताना मारहाण करण्यात आली. तेथे दुसरी मोटर (एमएच १० ईए ७५००) आल्यानंतर चौघांनी मला त्यात बसवले. रात्री ११.३० च्या सुमारास कर्नाटक मार्गे पहाटे अडीच वाजता गोव्यातील कळंगुट बीचजवळ लॉजवर नेले.

दि. १० रोजी सकाळी नऊ वाजता तेथून परत गाडीत बसवले. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास वनखंडे सरांच्या घराजवळ आणले. दोघे उतरून घरात गेले. काहीवेळाने परत आले. नंतर सांगलीत लक्ष्मी मंदिर चौकाजवळ रात्री साडेआठ वाजता सोडले. तेथून सांगली ग्रामीण पोलिस मला घेऊन पोलिस ठाण्यात आणले. अपहरण प्रकरणात समीर व्हनवाडे (रा. नरवाड), अजय कट्टीकर, गोटू गावडे, क्षीरसागर (सर्व रा. मालगाव) यांचा सहभाग असल्याचेही इंगळे यांनी जबाबात म्हंटले आहे.दादा कोण? इंगळे यांना जबरदस्तीने मोटारीत बसविल्यानंतर कोठे नेताय असे विचारल्यानंतर ‘दादांनी आणायला सांगितलंय, गाडीत बस’ असे म्हणून पिस्तूल रोखले होते असे जबाबात म्हंटले आहे. त्यामुळे दादा कोण? याचा पोलिस तपास करत आहेत.

निवडीपासून वंचित ठेवण्यासाठी अपहरणसभापती, उपसभापती निवड प्रक्रियेत वंचित ठेवण्यासाठी तसेच अजित शेजूळ यांच्या आईला उपसभापतिपद मिळवताना माझे मत त्यांना मिळणार नाही हे गृहीत धरून अपहरण केल्याचेही इंगळे यांनी जबाबात म्हंटले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli: Panchayat member abducted, threatened before election; recounts ordeal.

Web Summary : Pandurang Ingale, a Panchayat Samiti member, was abducted and threatened before a crucial election. He was forced into a car at gunpoint and taken to Goa. Police are investigating the kidnapping and the identity of the person known as 'Dada'.