शहरं
Join us  
Trending Stories
1
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
2
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
3
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
4
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
5
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
6
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
7
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
8
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
9
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
10
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
11
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
12
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
13
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
14
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
15
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
17
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
18
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
19
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
20
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
Daily Top 2Weekly Top 5

खानापुरात मामा-भाचीवर कोयत्याने हल्ला

By admin | Updated: December 22, 2016 23:33 IST

दोघेही गंभीर जखमी : हल्लेखोर युवक फरारी; कारण अस्पष्ट; रुग्णालयात दाखल

विटा : खानापूर येथे युवकाने कोयत्याने केलेल्या खुनीहल्ल्यात मामा व भाची गंभीर जखमी झाले. पूनम नंदकुमार जाधव (वय २५, रा. मूळ गाव राजेवाडी, ता. आटपाडी) व तिचे मामा बाळकृष्ण किसन गवळी (५२, रा. खानापूर) अशी त्यांची नावे आहेत. हल्लेखोर योगेश विजय जाधव (रा. कुर्ली, ता. खानापूर) फरारी झाला आहे. ही घटना गुरूवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. घटनेचे कारण अद्याप अस्पष्ट असले तरी, एकतर्फी प्रेमप्रकरणातून ही घटना घडल्याची चर्चा आहे.पूनम जाधव खानापूर येथे मामा बाळकृष्ण गवळी यांच्याकडे आजोळी राहण्यास आहे. गुरूवारी दुपारी एक वाजता कुर्ली येथील योगेश जाधव खानापुरात गवळी यांच्या घरी गेला होता. योगेश व पूनम यांच्यात बोलणे सुरू असताना, वाद झाल्याने योगेशने पूनमला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी तिचे मामा बाळकृष्ण भांडण सोडविण्यास गेले असता, योगेशने पहिल्यांदा बाळकृष्ण यांच्या उजव्या हातावर व पायावर धारदार कोयत्याने वार केले. त्याचवेळी त्याने पूनमच्याही डोक्यात व पाठीवर वार केले. त्यात बाळकृष्ण व पूनम गंभीर जखमी झाले. हल्ल्यानंतर योगेशने तेथून पलायन केले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी येऊन जखमी मामा व भाचीला विटा येथील ग्रामीण रूग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल केले व नंतर पुढील उपचारासाठी दोघांनाही सांगलीच्या शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले. दरम्यान, या हल्ल्याचे नेमके कारण समजू शकले नसले तरी, हा हल्ला एकतर्फी प्रेमप्रकरणातून झाल्याची चर्चा खानापुरात आहे. या घटनेची नोंद विटा पोलिसांत झाली असून पोलिस निरीक्षक अमोल शिंदे पुढील तपास करीत आहेत. (वार्ताहर)हल्लेखोराचा शोध सुरू... मामा व भाचीवर धारदार कोयत्याने हल्ला केल्यानंतर हल्लेखोर योगेश जाधव घटनास्थळावरून फरारी झाला. हल्ल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी खानापूर व परिसरासह त्याच्या मूळ गावी कुर्ली येथे शोधमोहीम सुरू केली आहे. रात्री उशिरापर्यंत तरी तो पोलिसांच्या हाती सापडला नव्हता. हा हल्ला कोणत्या कारणामुळे झाला, हे योगेशला ताब्यात घेतल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.