शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: वाळव्यात नायकवडी काका - पुतण्या आमने सामने, केदार नायकवडी यांचा वैभव नायकवडींवर भ्रष्टाचाराचा आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 19:14 IST

हुतात्मा कारखान्यात यादवी सुरू

वाळवा : हुतात्मा साखर कारखान्यात अध्यक्ष वैभव नायकवडी यांनी सुमारे पावणे दोनशे कोटी रुपयांची साखर अनधिकृतपणे विकली असल्याचा आरोप केदार नायकवडी यांनी पत्रकार परिषदेत केला. विशेष म्हणजे केदार हे वैभव नायकवडी यांचे पुतणे आहेत. त्यांनी म्हटले की, आमचे आरोप खोटे असतील तर वैभव नायकवडी यांनी स्वतः त्याबाबत स्पष्टीकरण द्यावे किंवा सर्व सभासदांसमोर हुतात्मा चौकात एकाच व्यासपीठावर यावे. यामुळे हुतात्मा उद्योग समूहात काका-पुतण्या संघर्ष तापला आहे.केदार नायकवडी यांनी भ्रष्टाचाराचे पुरावे सादर करत हे आरोप केले. त्यानंतर कारखाना प्रशासनाने हे आरोप खोडसाळपणाचे असून स्वार्थासाठी केले असल्याचे म्हटले होते. त्यास प्रत्युत्तर देण्यासाठी केदार नायकवडी यांनी पत्रकार परिषद घेतली आणि जोरदार टीका केली.ते म्हणाले की, कारखान्यात कोट्यवधींची साखर अनधिकृतपणे विकली आहे. माझ्या तक्रारीनंतर प्रादेशिक सहसंचालक साखर यांनी गेल्या दोन महिन्यांपासून याबाबत चौकशी सुरू केली आहे. मात्र, शासकीय यंत्रणेवर दबाव टाकला जात आहे. हुतात्मा साखर कारखान्यात वैभव नायकवडी यांनी प्रचंड भ्रष्टाचार केला आहे आणि आता आम्ही स्वस्थ बसणार नाही. आम्ही खोडसाळपणे किंवा स्वार्थासाठी बोलत असू तर वैभव नायकवडी यांनी त्यावर स्वतः बोलावे. अधिकाऱ्यांना सांगण्याऐवजी त्यांनी खुलासा करावा.हुतात्मा साखर कारखान्यात भ्रष्टाचार झाला नसेल, तर वैभव नायकवडी यांनी कधीही आणि कुठेही एका व्यासपीठावर यावे किंवा हिम्मत असेल तर विशेष सर्वसाधारण सभा घ्यावी. वैभव नायकवडी हे या प्रकरणात पूर्णपणे अडकले आहेत, त्यामुळे ते बचावासाठी धडपडत आहेत. मात्र, हुतात्मा साखर कारखाना अण्णांच्या आचार आणि विचारांच्या धोरणानेच चालला पाहिजे. गेल्या तीन वर्षांत आम्ही कारखान्यात लक्ष दिले असता, जवळपास १८ ते २० कोटी रुपयांचा नफा कारखान्याला झाला आहे. यापुढे वैभव नायकवडी यांची कारखान्यातील भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे जनतेसमोर आणणार आहोत.

वैभव नायकवडी यांनी 'ॲग्रो नित्यम' नावाची कंपनी स्थापन करून कारखाना कसा लुटला याचा पुराव्यानिशी पर्दाफाश करणार आहोत. - केदार नायकवडी

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli: Nephew Accuses Uncle of Corruption in Sugar Factory

Web Summary : Kedar Nayakwadi accuses his uncle, Vaibhav Nayakwadi, of ₹1.75 billion sugar factory corruption. He demands public clarification, escalating family and business conflict. Investigation ongoing.