शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

कवठेमहांकाळमध्ये राष्ट्रवादीला भोपळा

By admin | Updated: August 11, 2015 00:33 IST

बाजार समिती निवडणूक : काँग्रेस समर्थकांचा जल्लोष

कवठेमहांकाळ : सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेसने कवठेमहांकाळ तालुक्यात बाजी मारल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या हाती भोपळा आला. काँग्रेस उमेदवारांच्या विजयाने कार्यकर्त्यांनी तालुक्यात फटाके उडवून आणि गुलालाची उधळण करून एकच जल्लोष केला. माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे आणि काँग्रेस समर्थकांमध्ये खुशीची लहेर पसरली आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांत मात्र सन्नाटा होता.काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. पतंगराव कदम, माजी मंत्री अजितराव घोरपडे, विशाल पाटील, विक्रम सावंत यांच्या नेतृत्वाखालील वसंतदादा रयत पॅनेलचे कवठेमहांकाळ तालुक्यातील तानाजीराव पाटील, प्रशांत शेजाळ, अजित बनसोडे आणि जयश्री पाटील हे उमेदवार विजयी झाले; तर माजी मंत्री जयंत पाटील, मदन पाटील, खासदार संजय पाटील, विलासराव जगताप, विजयराव सगरे, सुरेश पाटील यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी सहकार पॅनेलचे मनोहर पाटील, संजय पाटील, दादासाहेब कोळेकर आणि वर्षा लोंढे यांना नामुष्कीजनक पराभव पत्करावा लागला.तालुक्यात वसंतदादा रयत विरुद्ध शेतकरी सहकारी पॅनेल अशा अत्यंत चुरशीच्या सामन्याचे शनिवारी मतदान झाले. सोमवारी सकाळी आठ वाजताच कवठेमहांकाळ तालुक्यातील दोन्ही पॅनेलचे कार्यकर्ते शहरात येऊन निकालाची प्रतीक्षा करीत होते. जसे निकाल बाहेर येऊ लागले, तशी घोरपडे आणि काँग्रेस समर्थकांत खुशी, तर राष्ट्रवादी कार्यकर्त्यांत नाराजी पसरू लागली. दहा-साडेदहाच्या दरम्यान वसंतदादा रयत पॅनेलचे उमेदवार अजित बनसोडे यांच्या विजयाचा पहिला निकाल तालुक्यात येऊन धडकला. तेवढ्यात याच पॅनेलचे प्रशांत शेजाळ विजयी झाल्याचे समजले आणि वसंतदादा रयत पॅनेल समर्थकांनी जुने बस स्थानक, कवठेमहांकाळ ग्रामपंचायत, काँग्रेस कमिटी, दूध संघ, नवे बसस्थानक, साखर कारखान्यासमोर फटाके उडवून जल्लोष सुरू केला. (वार्ताहर)रयत आघाडीची दिवाळीमाजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे समर्थक आणि काँग्रेसच्या समर्थकांनी, पॅनेल विजयाकडे वाटचाल करीत असल्याचे लक्षात येताच मिरज गाठले. तसेच तालुक्यातील गावा-गावात काँग्रेस, पतंगराव कदम, अजितराव घोरपडे यांच्या विजयाच्या घोषणांचा वर्षाव झाला. रयत पॅनेलचे समर्थक दिवाळी साजरी करीत असताना, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत मात्र सन्नाटा निर्माण झाला होता. त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांनी आपले गाव गाठले. सायंकाळी सहानंतर माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे आणि विजयी उमेदवार कवठेमहांकाळ येथे आल्यानंतर कार्यकर्त्यांनी विजयी रॅली काढली.