शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

कर्नाटकच्या तीन लोकल गाड्यांचा सांगलीपर्यंत विस्तार करावा, रेल्वे सल्लागार समिती सदस्यांकडून पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2024 17:45 IST

सांगली : कर्नाटकातून येणाऱ्या हुबळी-मिरज एक्सप्रेस, लोंढा-मिरज एक्सप्रेस व कॅसलरॉक-मिरज एक्स्प्रेस या तीन लोकल गाड्यांना विजयनगर स्थानकावर अकारण तासभर ...

सांगली : कर्नाटकातून येणाऱ्या हुबळी-मिरज एक्सप्रेस, लोंढा-मिरज एक्सप्रेस व कॅसलरॉक-मिरज एक्स्प्रेस या तीन लोकल गाड्यांना विजयनगर स्थानकावर अकारण तासभर थांबून राहावे लागते. हा वेळ वाचविण्यासाठी या गाड्यांचा सांगलीपर्यंत विस्तार करावा व विश्रामबागलाही थांबा द्यावा, असा पर्याय रेल्वे सल्लागार समिती सदस्यांनी सुचविला आहे.मध्य रेल्वेचा पुणे व सोलापूर विभाग तसेच दक्षिण-पश्चिम रेल्वेचा हुबळी विभाग असे तीन विभागांच्या गाड्या मिरज जंक्शनवरून ये-जा करतात. कोल्हापूरहून उत्तरेकडे जाणाऱ्या, बंगळुरू व हुबळीतून उत्तरेकडे जाणाऱ्या, कोल्हापूरहून पंढरपूर, सोलापूर, नागपूरकडे जाणाऱ्या गाड्या, तसेच मुंबई, पुणे, राजस्थान, गुजरात, दिल्ली येथून हुबळी, गोवा व कर्नाटकच्या दिशेने जाणाऱ्या अनेक गाड्या मिरज जंक्शनवरून जात असतात. यातील अनेक गाड्यांचे इंजिन मिरजेत बदलले जाते. त्यामुळे मिरज जंक्शनमध्ये सहा प्लॅटफॉर्म असूनही दिवसभर गाड्यांमुळे प्लॅटफॉर्म व्यापलेले असतात. यामुळे कर्नाटकातून येणाऱ्या हुबळी-मिरज एक्स्प्रेस, लोंढा-मिरज एक्स्प्रेस व कॅसलरॉक-मिरज एक्स्प्रेस या तीन लोकल गाड्यांना विजयनगर (म्हैसाळ) स्थानकावर एक तास थांबून ठेवण्यात येते. विजयनगर ते मिरज हे अंतर फक्त आठ किलोमीटरचे आहे. इतके अंतर पार करण्यासाठी या तीन गाड्यांना एक तास वेळ जातो. त्यामुळे लाखो प्रवासी कंटाळून जातात. वर्षानुवर्षे हे हाल सुरू आहेत. त्यासाठीच या गाड्यांच्या विस्ताराचा प्रस्ताव देण्यात आला आहे.

काय आहे प्रस्तावमध्य रेल्वेच्या सल्लागार समितीचे सदस्य डॉ. दिलीप पटवर्धन यांनी रेल्वेकडे नुकताच प्रस्ताव दिला आहे. कर्नाटकातील गाड्या मिरजेत वेळेवर पोहोचाव्यात तसेच सांगली, मिरज व कुपवाड या तिन्ही शहरांच्या लोकांची सोय व्हावी यासाठी कर्नाटकच्या तीन लोकल गाड्यांना सांगली स्थानकापर्यंत विस्तार करून विश्रामबागलाही थांबा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

वेळेचा होणार सदुपयोगही मागणी मान्य झाल्यास विजयनगर येथे आल्यानंतर या तिन्ही गाड्या पाच मिनिटांत मिरज जंक्शनवर येतील. मिरजेत पाच मिनिटे थांबून त्या गाड्या पुढे विश्रामबागला थांबून सांगली रेल्वे स्टेशनला येतील. सांगली स्थानकावर दहा मिनिटे थांबून या गाड्या पुन्हा विश्रामबागमार्गे मिरजला रवाना होतील. या तिन्ही गाड्यांचे वेळापत्रक डॉ. पटवर्धन यांनी सुचवले आहे.

बाजारपेठेलाही फायदासांगली, विश्रामबाग स्थानकांचे दोर कर्नाटकशी बांधले गेल्यास येथील व्यापाऱ्यांनाही त्याचा फायदा होईल. कर्नाटकातील खरेदीदारांनाही याठिकाणी वेळेत पोहोचता येईल.

टॅग्स :Sangliसांगलीrailwayरेल्वेKarnatakकर्नाटक