या निवडीसाठी बुधवारी ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच वर्षा शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी ग्रामसेवक खुशाबा नरळे व सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. नूतन उपसरपंच पदाची माळ कलावंती तोरणे यांच्या गळ्यात पडली असून ही निवड बिनविरोध करण्यात आली.
उमदी येथे २०१८ साली झालेल्या निवडणुकीत सत्तांतर होऊन १७ पैकी १२ सदस्य काँग्रेसचे निवडून आणले होते. उपसरपंचपदी रमेश हळके यांची बिनविरोध निवड झाली होती. दोन वर्षे उपसरपंच पद असणाऱ्या रमेश हळके यांनी पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार राजीनामा दिला. कलावती तोरणे यांनी पक्षासाठी केलेल्या कामाची दखल घेत निवृत्ती शिंदे, वहाब मुल्ला, बंडा शेवाळे, डॉ. एल. बी. लोणी, बाबू सावंत, धोंडिराम शिंदे, संगप्पा हळके यांनी उपसरपंचपदी कलावती तोरणे यांची निवड केली. उमदी ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच पद महिलांकडे असल्याने गावात महिलाराज आले आहे. कलावती तोरणे यांची बिनविरोध निवड होताच समर्थकांनी गुलालाची उधळण करत आनंदोत्सव साजरा केला.
फोटो-१०कलावती तोरणे