शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणुकीपूर्वी एनडीए खासदारांची डिनर पार्टी रद्द; पंतप्रधानांच्या निवासस्थानी कार्यक्रम होणार होता; कारण आले समोर
2
एकाच पत्नीचे १५ पती! इंग्लंडला पाठवण्यासाठी लढवली शक्कल, ऐकून पोलिसही थक्क झाले
3
Punjab Flood : आभाळ फाटलं, पुराचा वेढा! पंतप्रधान मोदी करणार पंजाबचा दौरा; २००० गावं पाण्याखाली, ४६ मृत्यू
4
आरोग्य आणि जीवन विमा आता जीएसटी-मुक्त! पण प्रत्यक्षात किती प्रीमियम स्वस्त होईल?
5
साप्ताहिक राशीभविष्य: पितृपक्ष सुरुवात ७ राशींना तापदायी-संमिश्र; ५ राशींना लाभ-पैसा येईल!
6
जीएसटी कपातीनंतरही किंमत कमी केली नसेल तर मला सांगा, मी तिथे येईन; निर्मला सीतारामन यांचे विधान
7
गणेश विसर्जनावेळी वीजेचा शॉक लागून दुर्घटना; एकाचा मृत्यू, चौघे जखमी, मुंबईतील घटना
8
पंतप्रधानांच्या मणिपूर दौऱ्यासाठी जय्यत तयारी; १५००० लोकांची बैठक व्यवस्था, स्टेज उभारणीचे काम सुरू
9
३० वर्षीय विवाहितेचे १७ वर्षांच्या तरुणाशी संबंध, मुलीने आक्षेपार्ह स्थितीत पाहिल्यावर...
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या सकारात्मक भूमिकेचे मोदींकडून स्वागत; म्हणाले, "भारत आणि अमेरिकेमध्ये..."
11
२२ तास चाललेल्या मिरवणुकीनंतर लालबागचा राजा विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर दाखल
12
खलिस्तानी अतिरेक्यांना कॅनडामधून मदत; कनडा सरकारचा अहवाल : दोन संघटनांची केली नोंद
13
Thane: गणपती विसर्जन करताना पाच जण नदीत बुडाले, एकाचा मृतदेह मिळाला; दोघांचा शोध सुरूच
14
Ganpati Visarjan: भर पावसात, जल्लोषात गणरायाला निरोप; मुंबईत ढोल-ताशांसह गुलालाची उधळण
15
ट्रम्प यांचा यु-टर्न! टॅरिफ पद्धतीत केले बदल; महत्त्वाची खनिजे व औषधी उत्पादनांसह काही वस्तूंना सूट
16
आजचे राशीभविष्य - ७ सप्टेंबर २०२५, नवीन कामाची सुरूवात करण्यास अनुकूल दिवस
17
Aryna Sabalenka : बेलारूसच्या सुंदरीनं घरात घुसून घेतला बदला! सलग दुसऱ्यांदा जिंकली US ओपन स्पर्धा
18
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानात बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
19
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
20
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार

Sangli Crime: मूल होण्याचे औषध देण्याच्या बहाण्याने दागिने लंपास, भामट्यास अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 13:52 IST

स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई

सांगली : मिरज तालुक्यातील एका गावात दाम्पत्याला मूल होण्याचे औषध देतो असे सांगून सहा लाखांच्या दागिन्यासह पलायन केलेल्या भामट्यास स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक केली. संशयित नागेश राजू निकम (वय ३६, निमनिरगाव, ता. इंदापूर, जि. पुणे) याच्याकडून मोटार, दागिने असा सहा लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.संशयित नागेश राजू निकम हा दि. ३१ रोजी मिरज तालुक्यातील एका गावात दाम्पत्याला मूल होण्याचे औषध देतो असे सांगून सकाळी साडे नऊच्या सुमारास आला होता. दाम्पत्याला देवघरातील खोलीत बसवून निकम याने महिलेच्या अंगावरील सोन्या-चांदीचे दागिने एका कापडावर ठेवण्यास सांगितले. त्यानंतर मोटारीतून मंदिरात जाऊन येतो असे सांगून निकमने पितळी हंड्यात दागिने ठेवून तो पसार झाला.वीस मिनिटानंतर निकम हा घरी परत आला नाही. त्यामुळे दाम्पत्याने त्याची शोधाशोध सुरू केली. परंतू तो आढळून आला नाही. त्यामुळे फसवणूक केल्याचे लक्षात आले. महिलेने मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथक या प्रकरणातील भामट्याचा शोध घेत असताना सहायक निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकातील कर्मचारी सागर लवटे यांना निमनिरगाव येथील नागेश निकम याने केला असून तो सांगलीत फिरत असल्याची माहिती मिळाली. माधवनगर येथील जुना जकात नाका परिसरात संशयित मोटार दिसून आली. त्यामुळे पथकाने मोटार थांबवून नागेश निकम याला ताब्यात घेतले. त्याच्या मोटारीची तपासणी केल्यानंतर डिकीमध्ये पितळी हंडा आढळून आला. तसेच गिअर बॉक्ससमोर कपड्यात बांधलेले सोन्या चांदीचे दागिने आढळून आले. चाैकशीत त्याने दोन दिवसापूर्वी मिरज तालुक्यातील एका गावात मूल होण्याचे औषध देण्याचा बहाणा करून दागिने चोरल्याची कबली दिली. त्याच्याकडून पाच लाखांची मोटार, दागिने असा सुमारे सहा लाखांचा मुद्देमाल जप्त केला. त्याला मिरज ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात दिले.गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सतीश शिंदे, सहायक निरीक्षक पंकज पवार, कर्मचारी सागर लवटे, नागेश खरात, दरिबा बंडगर, सागर टिंगरे, संदीप नलावडे, अमिरशा फकीर, सतीश माने, संदीप गुरव, मच्छिंद्र बर्डे, उदयसिंह माळी, अनिल कोळेकर, अमर नरळे, संकेत मगदूम, इम्रान मुल्ला, केरबा चव्हाण, विक्रम खोत, शशिकांत जाधव, विकास भोसले, अभिजीत पाटील यांच्या पथकाने कारवाई केली.२० मिनिटात पसारदागिने कपड्यावर ठेवल्यानंतर २० मिनिटे जागेवरून उठायचे नाही, तसेच कोणासोबत बोलायचे नाहीस असे सांगितले. त्यामुळे दाम्पत्य देवघरातील खोलीत बसून राहिले. २० मिनिटानंतर भामटा परत न आल्यामुळे त्यांना संशय आला.