शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: इस्लामपूर मतदारसंघात 'जयंतगड' २१ हजार मतांनी ढासळणार, निशिकांत पाटील यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2024 16:41 IST

महायुतीकडून एकास एक उमेदवार देण्याच्या हालचाली

अशोक पाटीलइस्लामपूर : इस्लामपूर मतदारसंघात असलेला जयंत पाटील यांचा बालेकिल्ला आगामी विधानसभेला २१ हजार मतांनी ढासळेल, असा दावा भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला. महायुतीतून उमेदवार अद्याप निश्चित नाही. परंतु, आपण गेल्या ५ वर्षापासून निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहोत. महायुतीकडून एकास एकउमेदवार देण्याच्या हालचाली सुरू आहेत.गेल्या काही वर्षांत इस्लामपूर मतदारसंघात विकासाच्या दृष्टीने महायुतीकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न झाले. भाजप-शिवसेना यांच्या माध्यमातून इस्लामपूर शहरासह ग्रामीण भागात कोट्यवधीचा निधी उपलब्ध दिला. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत आमदार जयंत पाटील यांच्याविरोधात एकच उमेदवार देण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. यासाठी भाजपमधील अंतर्गत संघर्ष मिटवण्यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. गत निवडणुकीतील मतांची टक्केवारी पाहता महायुतीकडून मीच उमेदवारीसाठी प्रमुख दावेदार असेन, असा विश्वास निशिकांत पाटील यांनी व्यक्त केला.

जयंत पाटील यांना थेट आव्हानगणेशोत्सवानिमित्ताने आमदार जयंत पाटील यांनी राज्यभर संपर्क साधत आपले लक्ष इस्लामपूर मतदारसंघावर केंद्रित केले होते. त्यांचे चिरंजीव प्रतीक पाटील यांनीही मतदारसंघात आपला संपर्क वाढवला आहे. लोकसभा निवडणुकीत पक्षाला मिळालेल्या यशानंतर जयंत पाटील यांच्या नेतृत्वाची राज्य पातळीवर उंची वाढली. तरी मतदारसंघात मात्र विरोधक आव्हान देण्याच्या तयारीत आहेत. विशेषत: निशिकांत पाटील यांनी थेट आव्हान दिल्याने लढत चुरशीची होणार आहे.

जयंत पाटील यांचा राज्यासह मतदारसंघातील प्रत्येक घराघरापर्यंत संपर्क आहे. गेली ३५ वर्षे संघटनात्मक कार्यकर्त्यांची बांधणी यासह सहकारी संस्थांचे जाळे भक्कम आहे. गेल्या ७ निवडणुकांमध्ये भले-भले गाजावाजा करणारे पक्षनेते मतदारांनी पाहिले आहेत. परंतु जयंत पाटील यांचे मताधिक्य वाढतच जाईल. - विजय पाटील, अध्यक्ष, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, वाळवा तालुका.

टॅग्स :Sangliसांगलीislampur-acइस्लामपूरJayant Patilजयंत पाटीलBJPभाजपाvidhan sabhaविधानसभा