शंभराव्या नाट्यसंमेलनाचे जयंत पाटील निमंत्रक, ‘संगीत सीतास्वयंवर’ सादर होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2020 04:55 AM2020-03-02T04:55:13+5:302020-03-02T04:55:18+5:30

शंभराव्या नाट्यसंमेलनाचे उद्घाटन सांगलीत २७ मार्चला ज्येष्ठ रंगकर्मी सई परांजपे यांच्या हस्ते होत आहे.

 Jayant Patil, the host of the centenary of the centenary, will be presenting on 'Music Sitasavayar' | शंभराव्या नाट्यसंमेलनाचे जयंत पाटील निमंत्रक, ‘संगीत सीतास्वयंवर’ सादर होणार

शंभराव्या नाट्यसंमेलनाचे जयंत पाटील निमंत्रक, ‘संगीत सीतास्वयंवर’ सादर होणार

Next

सांगली : शंभराव्या नाट्यसंमेलनाचे उद्घाटन सांगलीत २७ मार्चला ज्येष्ठ रंगकर्मी सई परांजपे यांच्या हस्ते होत आहे. पालकमंत्री जयंत पाटील यांनी निमंत्रक म्हणून जबाबदारी स्वीकारली आहे, तर स्वागताध्यक्ष म्हणून ज्येष्ठ नेते शरद पवार, तसेच ९९ व्या संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी, १०० व्या संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल उपस्थित राहतील. उद्घाटनानंतर ‘संगीत सीतास्वयंवर’चा प्रयोग होणार असल्याची माहिती नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी पत्रकार बैठकीत दिली.
कांबळी यांनी रविवारी सांगलीत नाट्यसंमेलन तयारीचा आढावा घेत काही जागांची पाहणी केली. पत्रकार परिषदेत कांबळी म्हणाले, २५ जूनला तंजावरमध्ये सरफोजीराजे व शहाजीराजे यांच्या नाट्यसंहितांना नमन करून प्रारंभ होईल. सांगलीत २७ मार्चला उद्घाटन होईल. मुंबईत १४ जूूनला सांगता होईल. सांगलीत २६ मार्चला सायंकाळी मुंबईतील कलाकारांचे नाटक होणार आहे. २७ ला नाट्यदिंडी, उद्घाटन होईल. त्यानंतर सतीश आळेकर दिग्दर्शित ‘सीतास्वयंवर’ हे संगीत नाटक सादर होईल. २८ आणि २९ मार्चला सेलिब्रिटींची कलाकार रजनी होईल. २९ मार्चला भावे नाट्यगृहात दिवसभर कार्यक्रम होणार आहेत. चारही दिवसांत स्थानिक नाटके, एकपात्री, बालनाट्ये, एकांकिका आदी कार्यक्रम होतील.
>जागा चार
दिवसांत निश्चित
प्रसाद कांबळी म्हणाले, मान्यवरांना निमंत्रण, समित्यांच्या कामांचा आढावा, कलाकारांच्या व पाहुण्यांच्या याद्या, स्थानिकांचे नाट्यप्रयोग अशी तयारी सुरु आहे. जागा चार दिवसांत निश्चित होतील. आजवरच्या संमेलनांच्या स्मरणिकेची व प्रदर्शनाचीही तयारी सुरू आहे. सांगलीत आजवर पाच नाट्यसंमेलने झाली आहेत. शंभराव्या संमेलनासाठी सांगलीकर नागरिक, कलाकार व तज्ज्ञांच्या सूचनाही विचारात घेतल्या जातील.

Web Title:  Jayant Patil, the host of the centenary of the centenary, will be presenting on 'Music Sitasavayar'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.