शहरं
Join us  
Trending Stories
1
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
2
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
3
“मुंबईच्या गरब्यात सेलिब्रिटींवर लाखोंची उधळण, तेच पैसे शेतऱ्यांना दिले असते”: रोहित पाटील
4
तोंडात कुरकुरे अन् निपचित पडलेला मृतदेह; कोर्टातून फरार झालेल्या आरोपीचा चिमुकलीवर अत्याचार
5
मुंबई-पुण्यात घरांच्या विक्रीत १७% घट; 'या' कारणांमुळे ग्राहकांनी फिरवली पाठ; किमती कमी होणार का?
6
‘आयुष्मान भारत’ योजना बंद पडली? नागपूरच्या रुग्णालयांमध्ये उघडकीस आले धक्कादायक वास्तव; रुग्णांना सेवा नाकारल्या
7
Video - "देवाने हे नियम बनवले नाहीत..."; शॉर्ट्स घालून महिलेने मंदिरात प्रवेश केल्याने मोठा गोंधळ
8
VIDEO: 'पॉवर हिटिंग'! ३ वर्षांच्या चिमुरड्याची बॅटिंग पाहून तुम्हीही म्हणाल- What a Shot!
9
मृत्यूचे कुंड : १०० हून अधिक लोकांना गायब करणारी रहस्यमयी विहीर! ४० मीटर लांब, शास्त्रज्ञांनाही उलगडेना...
10
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
11
कोजागरी शरद पौर्णिमा २०२५: पंचकाची अशुभ छाया अन् अमंगल काळ, शुभ मुहूर्त कधी? लक्ष्मी लाभेल!
12
"मी आभार मानतो, त्यांनी माझे 1000 रुपये वाचवले...!"; फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली, नेमकं काय म्हणाले?
13
Dombivli Crime: मोबाईलचा पासवर्ड बदलला, कुटुंबात राडा! आई, दोन्ही मुले, आजोबामध्ये तुंबळ हाणामारी
14
अमानुष! लेकीशी भांडण... सासरच्यांनी जावयाला विष पाजलं, पळवून पळवून मारलं; झाला मृत्यू
15
२०२७ पर्यंत ५ राशींना साडेसाती, प्रदोषात ‘हे’ करावे; पंचक कायमचे टळेल, शनि शुभ-कल्याण करेल!
16
आंध्र प्रदेशात देवरगट्टू बन्नी उत्सवादरम्यान दोन जणांचा मृत्यू, ९० जण जखमी
17
Video: छातीत झाडल्या तीन गोळ्या, मित्राच्या हत्येचा बनवला व्हिडीओ; पोलिसांची उडाली झोप
18
हव्वा अन् धुव्वा...! महिंद्रा थार फेसलिफ्ट लाँच! हे दोन मुख्य बदल, ग्राहकांची मागणी ऐकली..., दोन नवे रंग...
19
Crime: 'मी तुमच्या मुलीची हत्या केलीये'; मित्रासोबत रुमवर गेली अन् निळ्यामध्ये ड्रममध्ये...; तरुणीची हत्या का केली?
20
Neena Kulkarni: ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी यांना मानाचे विष्णुदास भावे गौरव पदक जाहीर!

Sangli Politics: विषय संपवा म्हणून जयंत पाटील यांचा फोन, चंद्रकांत पाटील म्हणाले..

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 14:37 IST

'भाजपमध्ये आले, तर जयंत पाटील यांना मागे बसावे लागेल'

सांगली : विषय संपवा म्हणून जयंत पाटील यांचा फोन आला होता. पण, वार झाला आता प्रतिवार होणारच, असे त्यांना मी स्पष्टपणे सांगितले. आजच्या सभेने त्यांची परतफेड झाली आहे. आम्ही गप्प बसलो नाही, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.सांगलीत बुधवारी भाजपची सभा पार पडली. यावेळी पुतळ्यास विकृत संस्कृतीचा रावण असे नाव देत त्याचे दहन केले. चंद्रकांत पाटील म्हणाले की, अरे म्हणणाऱ्याला कारे म्हणण्याची तयारी कार्यकर्त्यांनी केली पाहिजे. इशारा सभा होऊ नये, असे जयंत पाटील यांना वाटत होते. जयंत पाटील यांचे साखर कारखाने लाटण्याचे प्रकरण ही तर केवळ प्रस्तावना आहे. दगाबाज पुस्तक वाचा. महाराष्ट्राचे वाटोळे कोणी केले हे तुम्हाला समजेल. बहुजन समाजातील, गावगाड्यातील व्यक्ती ओबीसी आरक्षणामुळे सरपंच होते, तो सरपंच मंचावर बसतो, तुम्हाला खाली बसावे लागते, हे तुम्हाला पटलेले नाही. महाराष्ट्राची ही स्थिती दगाबाजाने निर्माण केल्याचा आरोप त्यांनी केला. ते म्हणाले, महाराष्ट्राच्या दगाबाजाने किती साखर कारखाने घेतले, कुठे मालमत्ता ठेवली? हे सारे गुपित आहे. निवडणूक आयोगाच्या शपथपत्रात एक गाडीही त्यांच्या नावावर नाही. पण, त्यांची किती विमाने आहेत, कोणत्या विमान कंपन्यात गुंतवणूक आहे, हे आम्हाला माहिती आहे. आता वेळीच शहाणे व्हा, असा इशारा देण्यासाठी ही सभा आहे. तुम्ही शिव्या देणारी पिलावळ उभी केली. या विकृतीच्या रावणाला आम्ही जाळत आहोत. आम्ही ठिकाणावर आहोत, तुम्ही ठिकाणावर राहा.भाजपमध्ये आले, तर जयंत पाटील यांना मागे बसावे लागेलआमदार जयंत पाटील यांना भाजपमध्ये प्रवेश देऊ नका, अशी मागणी आ. गोपीचंद पडळकर, सम्राट महाडिक यांनी सभेत केली. तो धागा पकडत मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, जयंतराव, कुणाला भेटतात, कधी भेटतात, हे मला माहीत आहे. पण, ते भाजपमध्ये आले तर त्यांना मागे बसावे लागले. जिल्ह्यात ते ज्युनिअर, तर गोपीचंद सिनीअर आहेत. त्यांना ‘गोपीचंद तुम आगे बढो’च्या घोषणाही द्यावी लागतील. पण, ते भाजपमध्ये येणार नाहीत. कार्यकर्त्यांचीही तीच भावना आहे. ही भावना मुख्यमंत्र्यापर्यंत पोहचवू.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli Politics: Patil's retort to Jayant Patil's call for truce.

Web Summary : Chandrakant Patil asserts retaliation after Jayant Patil's call for truce. He criticizes Jayant Patil's alleged corruption and warns against his potential entry into BJP, stating junior status.